आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फाटलेल्या गादीमुळे एका रात्रीत भिकारी झाला लखपती, असे मिळाले 40 लाख रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात नशीबाची मोठी भूमिका असते. नशीबाची साथ असल्यास व्यक्ती पाहता पाहता यशस्वी होतो. त्याबरोबर त्याचे आयुष्यही बदलून जाते. आता या भिकाऱ्याचीच गोष्ट ऐका ना... हे प्रकरण असे आहे की, जे वाचून तुम्हाला हसू येईल आणि आश्चर्ययही वाटेल. 

 

एक भिकारी जो झाला लखपती...
हे प्रकरण उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील राणपुर तालुक्यातील आहे. याठिकाणी एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एका रात्रीत भिकाऱ्याचे आयुष्य बदलून गेले. बातम्यांनुसार, याठिकाणी बापलेक एका भिकाऱ्याचा शोध घेत आहेत. त्या लेकाने आपल्या वडिलांना न विचारता फाटकी गादी मंदिराबाहेर बसलेल्या भिकाऱ्याला दिली. त्यानंतर वडिलांनी या गादीबद्दल विचारल्यावर मुलाने सांगितले की, ही गादी एका भिकाऱ्याला दान दिली. ते ऐकूण वडिलांना मोठा धक्का बसविला. त्याचे कारण म्हणजे वडिलांनी या गादीमध्ये बचतीचे 40 लाख रुपये ठेवले होते. हे ऐकूण दोघेही मंदिरात पोहोचले. मात्र तेथून भिकारी निघून गेला होता.

 

तीन दिवसांनी सापडला भिकारी
बातम्यांनुसार, या घटनेच्या तिसऱ्या दिवशी दोघांनी एका मंदिराबाहेर भिकाऱ्याला शोधून काढले. मात्र त्यांनतर नशीबाने पुन्हा पलटी मारली. त्या भिकाऱ्याने दुसऱ्या भिकाऱ्याला काही पैशांमध्ये ही गादी विकली होती.

 

पोलिसांनी सांगितले माहिती नाही
जेव्हा याबाबत पोलिस ठाण्यात कळविण्यात आले तेव्हा या प्रकरणाबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले. मात्र या भिकाऱ्याबाबत विचार करा, त्याचे नशीब कसे पालटले?

 

 

पुढील स्लाईडवर पाहा - फोटोज्

बातम्या आणखी आहेत...