(डॉगीसोबत एक निरागस चिमुकला)
अनेकांच्या घरी प्राणी पाळण्याची आवड असते. त्यामध्ये जास्तित जास्त लोक डॉगी पाळणे पसंत करतात. काहींना मांजर तर काहींना ससा, पोपटसारखे प्राणी-पक्षी पाळायला आवडते.
दिवसभर
आपल्यात वावरणारे प्राणी आपल्या घरातील सदस्य बनतात. आपल्या घरातील प्रत्येक सदस्यांशी त्यांचे प्रेमाचे नाते तयार होते. त्यांच्या प्रती आपले प्रेमसुध्दा हळू-हळू वाढत जाते. आपली प्रत्येक गोष्ट ऐकण्यास ते तयार असतात. वेळ पडल्यास आपली इमानदारीसुध्दा दाखवतात.
हे प्राणी घरातील चिमुकल्यांच्या सर्वात जास्त जवळ असतात. मुलांसोबत खेळण्यासाठी या प्राण्यांपेक्षा चांगला मित्र त्यांना दुसरा नसतो. तसेच, डॉगीविषयी आहे. डॉगी घरातील चिमुकल्यांचे विशेष काळजी घेतात. वरील छायाचित्रेच बघा ना, त्यामध्ये डॉगी गोंडस मुलांवर कसे प्रेम दाखवतात. त्यांच्याकडे पाहून असे वाटते, की हे डॉगी चिमुकल्यांचे म्हणणे किती सहजरित्या समजू शकतात.
मागील काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ समोर आला होता. त्यामध्ये एक डॉगी रडणा-या छोट्या मुलाला खेळणी देऊन शांत करतो. यावरून स्पष्ट होते, की प्रेम आणि जिव्हाळा लावण्यास प्राणी आणि मनुष्यांत एक खास नाते निर्माण होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा घरात पाळलेले डॉगी कशाप्रकारे चिमुकल्यांची काळजी घेतात...