आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बापरे! येथे निघाला मांजरीहून मोठा उंदीर, आकार पाहून पेस्ट कंट्रोलरही घाबरला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काय होईल जेव्हा तुमच्यासमोर मांजरीच्या आकाराचा उंदीर येईल. विचार करायला थोडे वेगळेच वाटेल पण हे खरे आहे. ब्रिटनच्या न्यू आर्सफोर्ड येथे एका उंदराला पाहून पेस्ट कंट्रोलरही घाबरला. एका घराच्या गार्डनमध्ये Daren George पिंजरा लावून उंदीर पकडत होते तेव्हा एक मोठा उंदीर त्या जाळ्यात अडकला. जवळून पाहिले तर घाबरला पेस्ट कंट्रोलर जॉर्ज...

 

- जेव्हा जॉर्ज यांनी उंदराला बाहेर येताना पाहिले तेव्हा त्याचा साईज पाहून ते बुचकळ्यात पडले. त्यांनी सांगितले की, इतका मोठा उंदीर मी आजपर्यंत पाहिला नाही.
- जॉर्जने त्याची लांबी मोजली तर ती जवळपास 1.66 फीट (20 इंच) इतकी होती.
- ब्रिटनमध्ये असलेला हा सर्वात मोठा उंदीर असल्याचे सांगितले जात आहे. 

ब्रिटनमध्ये सुरु आहे सफाई अभियान
- नुकतेच ब्रिटनमध्ये उंदरांमुळे रोगराई पसरत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे सध्या तिथे सफाई अभियान सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये 35 लाख उंदीर शहरात आणि 20 लाख उंदीर सीवर्स येथे आहेत. 

 

जानेवारीमध्ये पकडला होता 19 इंचाचा उंदीर...
- याअगोदर ब्रिटनमध्ये आतापर्यंत सर्वात मोठा उंदीर जानेवारीमध्ये पकडण्यात आला होता. तो 19 इंचाचा होता. त्यानंतर हा सर्वात मोठा उंदीर पकडण्यात गेला आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, उंदराचे अजून काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...