लंडन- एयरबस ए-380 च्या एका खास मॉडलने उड्डाण केले. पण या विमानात वैमानिक नव्हता. स्वीत्झर्लंडमध्ये एका विशेष एअरशोत हा प्रयोग करण्यात आला. या विमानाला रिमोट कंट्रोलच्या मदतीने उडवण्यात आले. हे विमान तयार करण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी लागला. यासाठी तब्बल 5 हजार तास खर्च करण्यात आले. यात चार जेट इंजिन लावण्यात आले.
या विमानाचा उड्डाण करतानाचा व्हिडिओ तब्बल 1 कोटी 61 लाख लोकांनी बघितला. वारंवार हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे.
पीटर मायकल नावाच्या व्यक्तीने याची निर्मिती केली आहे. मुळ एयरबस ए-380 च्या तुलनेत हे मॉडेल 14 पट लहान आहे. रिमोटने कंट्रोल केले जाणारे हे जगातील सर्वांत मोठे विमान आहे. लॅंडिंग करण्यापूर्वी पाच वेळा या विमानाने यशस्वी उड्डाण केले. यावर सिंगापूर एअरलाईन्सचा लोगोही लावण्यात आला होता.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या विमानाचे फोटो... असे केले उड्डाण....