आजकाल सोशल नेटवर्कींग साईट्स लोकांसाठी कमाईचा मार्गही मोकळा करत आहे. वेगवेगळ्या साईट्सवर लोक त्यांचे फोटो आणि व्हिडिओ टाकून प्रसिद्दी मिळवत आहेत. केवळ प्रसिद्धीच नाही तर ते कमाईही करत आहेत. अशीच प्रसिद्धी मिळविली आहे अमेरिकात राहणाऱ्या 25 वर्षीय एबिगेल रैचफोर्ड Abigail Ratchford)ने. एबिगेल इंस्टाग्रामवर तिचे फोटोज् अपलोड करुन अनेक कोटींची कमाई करत आहे. जवळपास 80 लाख आहेत फॉलोअर्स..
इंस्टाग्रामवर एबिगेलची ओळख बिकीनी मॉडेल अशी आहे. एका वेबसाईटनुसार, एबिगेल साल 2013 मध्ये प्रसिद्ध झाली होती. तिच्या एका प्रोफएसनल फोटोग्राफर असलेल्या मित्रानेल तिला बिकीनी फोटोशूट करुन सोशल साईट्सवर स्वतःचे प्रोफाईल बनविण्यास सांगितले होते. तिने ते केले आणि अनेक ब्लॉगर्सनी तिच्याबद्दल लिहीयला सुरुवात केली. तिने सांगितले की, तिची लोकप्रियता इतकी वाढली की मॅक्सिम या मासिकातही तिचे फोटो छापून आले. त्यानंतर तिने इन्सटाग्रामवर तिचे अकाउंट बनवले आणि काही दिवसातच तिचे 20 हजार फॉलोअर्स झाले.
यानंतर तिने स्वीमसुट आणि बिकीनी फोटो यावर शेअर करण्यास सुरुवात केली आणि तिचे काही दिवसात 7 लाख फॉलोअर्स झाले. त्यानंतर तिने अनेक ब्रँडेड कंपनीचे कपडे घालून फोटो काढले. ती सांगते जेव्हा माझे 10 लाख फॉलोअर्स होते तेव्हा मी दीड हजार डॉलर म्हणजेच (95 हजार रुपए) चार्ज करत असे पण आता माधे 80 लाख फॉलोअर्स आहेत तर मी 6 हजार डॉलर (जवळपास तीन लाख रुपए) चार्ज करते.
ती म्हणते की तिला आता आनंद होतो की ती चांगली कमाई करत आहे. कधीकाळी बारटेंडर आणि सेक्रेटरीचे काम करुन ती केवळ 600 डॉलर मिळवत असे पण आता ती तिच्या कमाईने खूश आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, एबिगेलचे काही फोटोज्..