आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: धाकट्या बहिणीसोबत आहे अभिनयचे स्ट्राँग बाँडिंग, आई प्रिया म्हणते माझी मुले समंजस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांचा मोठा मुलगा अभिनयने आईवडिलांच्या पावलावर पाऊल चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केले आहे. याचवर्षी जानेवारी महिन्यात अभिनयचा 'ती सध्या काय करते' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या चित्रपटानंतर 'अशी ही आशिकी' या सचिन पिळगावकर दिग्दर्शित चित्रपटातून अभिनय पुन्हा एकदा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज लक्ष्मीकांत आणि प्रिया बेर्डे यांचा हा मुलगा 20 वर्षांचा झाला आहे. अभिनयला एक धाकटी बहीणसुद्धा आहे. स्वानंदी हे तिचे नाव असून ती 16 वर्षांची आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन झाले तेव्हा अभिनय 7 वर्षांचा तर स्वानंदी फक्त 4 वर्षांची होती. त्यांच्या पश्च्यात अभिनय स्वानंदीसाठी वडिलांची भूमिका निभावतोय.
 
प्रिया बेर्डे म्हणतात, माझी मुले समंजस... 
अभिनय आपल्या बहिणीची अगदी मोठ्या भावाप्रमाणे सतत काळजी घेत असतो. प्रिया बेर्डे यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या या दोन मुलांविषयी सांगितले होते. त्या म्हणाल्या होत्या, अभिनय आपल्या बहिणीची एखाद्या समंजस आणि थोरल्या भावासारखीच काळजी घेत असतो. विशेष म्हणजे स्वानंदीही त्याची काळजी घेते. दोघांचं आता एकमेकांशी असलेलं 'बाँडिंग' इतकं जबरदस्त आहे, की कधी कधी मलाही थक्क व्हायला होतं. या दोघांसारखी समंजस मुलं असल्यामुळे मी स्वत:लाच खूप भाग्यवान समजते.

15 भावांची एकुलती एक बहीण आहे स्वानंदी... 
स्वानंदी अभिनयची धाकटी बहीण आहे. विशेष म्हणजे बेर्डे कुटुंबातील ती एकुलती एक मुलगी आहे. बेर्डे कुटुंबात आम्हा 15 चुलत भावंडांची ती लाडकी आणि एकुलती एक बहीण आहे. त्यामुळे घरात सगळ्यांची ती लाडकी असल्याचे अभिनय सांगतो. तो म्हणतो, "स्वानंदी घरात लहान आहे. त्यामुळे ती आमच्या सगळ्यांची अतिशय लाडकी आहे. हवं ते करण्याची मुभा तिला आमच्याकडून देण्यात आली आहे. ती तिला हवे ते एक्सपिरिमेंट्स करु शकते. ती अतिशय महत्त्वकांक्षी आहे. आयुष्यात खूप काही करायची तिची इच्छा आहे. तिला जग फिरायचंय आहे. आयुष्यात जे काही ठरवले ते ती 100 टक्के पूर्ण करणार ही मला आशा आहे. मी कदाचित एखाद्या गोष्टीत अडकून पडू शकतो, पण ती स्वतःला कधीच एका चौकटीत बांधू ठेवणार नाही."

स्वानंदीच्या कायम पाठिशी उभा असतो अभिनय... 
अभिनय पुढे म्हणतो, "स्वानंदीला जेव्हा माझी गरज असते, तेव्हा मी तिच्या पाठिशी उभा असतो. सोशली कसं राहावं हे मी तिला सांगत असतो. माझं कॉलेज पूर्ण झालंय, त्यामुळे कॉलेजमधील अनुभव मी तिच्यासोबत शेअर करत असतो. कॉलेजमध्ये कसं राहावं, लोकांमध्ये कसं वागावं, या सगळ्यांची शिकवण माझ्याकडून तिला मिळत असते."

पाहुयात, अभिनयचे धाकट्या बहिणीसोबतचे स्ट्राँग बाँडिंग दाखवणारे काही खास फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...