आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Birthing Photo Contest Captures The Beautiful And Evocative First Moments Of Motherhood

जेव्हा आईने पहिल्यांदा कवटाळले आपल्या बाळाला, बघा डिलिव्हरीचे अवॉर्ड विनिंग Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूएसच्या डेनवर शहरातील birthbecomesher.com या वेबसाइटने 'Moment of Birth Image Contest' या स्पर्धेच्या विजेत्यांची नावे जाहिर केली असून विजेत्यांनी क्लिक केलेले फोटोज प्रकाशित केले आहेत. या स्पर्धेच्या आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेत सहभागी झालेल्या जगभरातील विविध फोटोग्राफर्सनी डिलिव्हरीच्या काळातील सौंदर्य आणि भावूक क्षण आपल्या कॅमे-यात कैद केले असून हे फोटोज लोकांना प्रेरणा देणारे आहेत. जेव्हा आई आपल्या बाळाला पहिल्यांदा कवटाळते, त्या क्षणी तिच्या चेह-यावर उमटणारे भाव तुम्ही या फोटोजमध्ये बघू शकता. 
100 हून अधिक फोटोग्राफर्स झाले होते स्पर्धेत सहभागी...
वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेत जगभरातील 100 हून अधिक फोटोग्राफर्सनी सहभाग नोंदवला होता. परीक्षकांनी सांगितले, की ही सर्व छायाचित्रे सुंदर आणि मनाला भावणारी आहेत.  

चार श्रेणीत जाहीर झाले निकाल...
वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, चार श्रेणीत विजेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. ग्रॅण्ड प्राइजच्या रुपात पहिल्या विजेत्याला 12 हजार ($200), दुसरे, तिसरे स्थान आणि पब्लिक चॉईस पटकावणा-याला 6 हजार रुपये ($100) पुरस्काराच्या रुपात देण्यात आले. या स्पर्धेत पहिले स्थान लॉस एंजिलिसची फोटोग्राफर रेबेका कोरसे (Rebecca Coursey) ने पटकावले आहे. तर दुस-या स्थानावर यूकेची फोटोग्राफर हन्ना पालमारा (Hannah Palamara) आणि तिस-या स्थानावर ब्रिसबेनची फोटोग्राफर सेलेना रोलसन आहे.

पुढील स्लाईड्सवर बघा, या स्पर्धेतील अवॉर्ड विनिंग PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...