(ब्लॅकआउट हॉन्टेड हाऊस)
तुम्ही भूत-प्रेताविषयी तुम्ही अनेक किस्से ऐकलेले असतील. परंतु आम्ही तुम्हाला भूता-प्रेताच्या घरांविषयी सांगत नाहीये. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात भयावह घराविषयी माहिती देत आहोत. त्यामध्ये केवळ 18 वर्षांपुढील लोक प्रवेश करू शकतात. या घरात 18 वर्षा खालील मुलांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
हे भयावह घर न्यूयॉर्कमध्ये आहे. घराचेदेखील त्याच्या स्वरुपाप्रमाणेच भीती वाटण्यासारखे आहेत. 'ब्लॅकआऊट हॉन्टेड' नावानी ओळखल्या जाणा-या या घरात हॉलिवूड सिनेमांप्रमाणे अनेक सीन तयार करण्यात आले आहेत. हे सीन पाहून लोक
आपली हिम्मत गमावून बसतात. या घरात जाऊन आलेला मानसोपचार तज्ञ रुबेन पेरेज सांगतो, माझ्या मित्राने एकाला किडनॅप केले आणि या घरात आणले. माझ्यासाठी हा खूप वाईट अनुभव होता. डोळे उघडताच माझे हृदय धडधड करायला लागले. मला एकदम धास्तीच बसली.
या भयावह घरात हिंसा, न्यूडिटी, आणि जोरदार पाण्याचे फवा-यांसह चित्र-विचित्र घटना घडतात आणि आवाज येतात. हे आजाव लोकांच्या हृदयाची धडधड वाढवणारे असतात. या घरात प्रवेश करायचा असल्यास पैसे मोजावे लागतात. एका व्यक्तीसाठी 2760पासून ते 8280पर्यंत प्रवेश शुल्क आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या भयावह घराच्या आतील छायाचित्रे...
नोट- या भयावह घरात दाखवण्यात आलेली सर्व छायाचित्रे बनावट आहेत, ती फक्त लोकांना भीती दाखवण्यासाठी आहेत...