आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाणे ऐकताना तुमच्‍यासोबत होत‍ असेल असे, तर सामान्‍यांपेक्षा वेगळे आहात तुम्‍ही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाणे ऐकताना तुमच्‍या ह्र्द्याची धडकने तीव्र होतात? तुमच्‍या अंगावर शहारे येतात? तुमचे डोळे मोठे होतात? तुमचे उत्‍तर होय असेल तर तुम्‍ही सामान्‍यांपेक्षा वेगळे आहात. हॉर्वर्ड विद्यापीठाने केलेल्‍या संशोधनातून नूकतेच हे समोर आले आहे की, गाणे ऐकतात ज्‍यांना वेगळा अनुभव येतो, अशा व्‍यक्‍तींचा मेंदू हा सामान्‍यांपेक्षा जास्‍त शक्‍तीशाली असतो.

 

- यासंबंधी संशोधन करणारे Matthew Sachs सांगतात की, अशा व्‍यक्‍तींच्‍या शरीरात फायबर अधिक प्रमाणात असते. हे फायबर आवाजाला मेंदूपर्यंत पोहोचवतात त्‍यामुळे व्‍यक्‍तीला असे अनुभव येतात. याच कारणामुळे गाणे ऐकताच अशा व्‍यक्‍तींचा मेंदु सामान्‍यांच्‍या तुलनेत गाण्‍यांना जास्‍त प्रमाणात प्रतिसाद देतो. मॅथ्‍यू यांनी सांगितले की, जगामध्‍ये अशा व्‍यक्‍तींच प्रमाण खूप कमी आहे. अशा व्‍यक्‍ती केवळ संगीताद्वारे आपल्‍या शरीराची रिकव्‍हरी आणि मानसिक आजारांपासून मुक्‍ती मिळवू शकतात.


कित्‍येक आजारांपासून वाचवते संगीत
- संशोधनामध्‍ये दावा करण्‍यात आला आहे की, संगीताद्वारे नैराश्‍य आणि अनेक मानसिक आजारांचा उपचार करता येणे शक्‍य आहे. तसेच अशाही काही धुन बनवता येतील ज्‍याद्वारे मानसिक आजारांपासून बचाव करता येईल.


चीनमध्‍ये संगीताला मानले जाते औषध
चीनच्‍या प्राचीन ग्रंथामध्‍ये संगीताला औषधीचा दर्जा देण्‍यात आला आहे. इतकेच नव्‍हे तर चीनमध्‍ये औषध शब्‍दाची उत्‍पत्‍तीच संगीताच्‍या शब्‍दातून झाली आहे.


पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या...या संशोधनातील आणखी काही फॅक्‍ट्स...

 

 

बातम्या आणखी आहेत...