(बोल्व्हियाच्या पूर्वेस राहणाऱ्या मॅनोनाइट्स लोकांचे छायाचित्र)
बोल्व्हियाच्या पूर्वेस राहणाऱ्या मॅनोनाइट्स लोकांना आधुनिक पद्धतीने राहणे आवडत नाही. इतकेच काय, त्यांना छायाचित्रे काढलेलीही आवडत नाहीत. छायाचित्रे काढणे हा प्रकारच त्रासदायक वाटतो. यांची छायाचित्रे पहिल्यांदा जॉर्डी रुईज सिअरा यांनी काढली होती.
रुईज येथे 2011 मध्ये आले. त्यांच्यासोबत राहिले, वेळ घालवला. त्यांचा विश्वास संपादन केला. तेव्हा कुठे त्यांना छायाचित्रे टिपण्यात यश मिळाले. येथील लोकांची जीवनशैली त्यांना खूप आवडली. येथील लोकांचा मुख्य उद्योग शेती असून विस्तीर्ण प्रमाणात शेती पसरलेली दिसून येते. या लोकांचे ग्रामीण जीवन एकाकी आणि साधे-सरळ आहे. त्यांचे रीतिरिवाज, परंपरा यांना ते महत्त्व देतात.
रुईज त्यांच्या जीवनावर पुस्तक लिहीत असून ते लवकरच प्रसिद्ध होत आहे. रुईज या संदर्भात बोलताना सांगितले, या लोकांची छायाचित्रे काढणे खूप अवघड काम होते. ही मंडळी अशिक्षित नाहीत. त्यामुळे त्यांच्या विचारांत बदल घडवणे खूप अवघड आहे. अत्यंत आकर्षक गाऊन आणि हॅट वापरून येथील महिला शेतात काम करतात. कॅमेऱ्याकडे त्या खूप रोखून पाहतात. रुईजनी त्यांना छायाचित्र काढण्याची परवानगी मागितली. त्यास त्यांनी नकार दिला. कॅमेऱ्यासमोर पोझ देता येत नाही. यापूर्वी आम्ही कधीही छायाचित्रे काढलेली नाहीत, असे त्या सांगतात. आमचे लक्ष नसेल तेव्हा तुम्ही छायाचित्रे काढू शकता, असेही त्या म्हणाल्या. अशी आठवण रुईज यांनी सांगितली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या समुदायाची आणखी काही छायाचित्रे...
फोटो साभारः newslocker.com