आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Brain Dead Woman Robyn Benson`S Life Support Will Be Remove After Child Birth

...आणि बाळाला जन्म देताच जगाचा निरोप घेणार आहे ही दुर्दैवी आई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आई होणं हे प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं. आपल्या माध्यमातून एक जीव जन्मायला येणं ही कल्पनाच अनोखी असते. जर एखाद्या महिलेला आई होण्याचा मान मिळाला. परंतु, हा आनंद ती अनुभवू शकत नसेल किंवा याची तिला जाणिवच नसेच... तर यापेक्षा दुर्दैव ते कोणतं... असंच एका महिलेच्या बाबतीत झालंय... एवढंच नव्हे तर एका गुटगुटीत बाळाला जन्म दिल्यावर ती या जगाचा निरोपही घेणार आहे. अशी मनाला चटका लावणारी घटना कॅनडात घडत आहे.
कोमात असलेली ही कॅनेडिअन महिला आपल्या बाळासाठी आणखी दोन महिने या जगात राहणार आहे. मार्चच्या शेवटी मुलाला जन्म देताच ती जगाचा निरोप घेणार आहे.
सध्या ती 27 आठवड्यांची गर्भवती आहे. तिच्या मुलाच्या जन्मासाठी फक्त 10 आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्या महिलेला लाइफ सपोर्ट सिस्टमच्या आधारे जीवंत ठेवण्यात आले आहे.
रोबिन नावाच्या या महिलेला डिसेंबरच्या शेवटी ब्रेन हॅमरेज झाला होता. त्यावेळी ती 22 आठवड्यांची गर्भवती होती. ऑपरेशन करून तिची डिलीव्हरी केली जाणार आहे. त्यानंतर रोबिनला जीवंत ठेवण्यासाठी लावण्यात आलेले मशीन काढून टाकण्यात येणार आहेत. व्हिक्टोरिया जनरल हॉस्पिटलच्या एका सूत्राने या प्रकारणाची माहिती दिली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या या प्रकरणाविषयी अधिक माहिती...