कॅनाडाची ब्रेन डेड गर्भवती महिलाने एका गुटगुटीत बाळाला जन्म देऊन काही दिवसांपूर्वी जगाचा निरोप घेतला. या महिलेला लाइफ सपोर्ट सिस्टमने जीवंत ठेवण्यात आले होते. परंतु जेव्हा लाइफ सपोर्ट सिस्टम काढून टाकण्यात आले तेव्हा तिचा मृत्यू झाला.
ब्रिटीश कोलंबियाची रहिवासी रोबिन बेनसनला व्हिक्टोरिआ या हॉस्पिटलमध्ये मागील काही दिवसांपासून दाखल करण्यात आले होते. तिला लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते. डॉक्टर प्रयत्न करत होते, की ती काही दिवस जीवंत राहावी कारण तिचे बाळ सुरक्षित जन्माला यावे. या महिलेला डिसेंबरच्या शेवटी ब्रेन हेमरेज झाला होता. तेव्हा ती 22 आठवड्यांची गर्भवती होती.
डॉक्टरांनी या गर्भवती महिलेचे 28 आठवडे पूर्ण झाल्यानंतर डिलिव्हरी केली. सांगितले जात आहे, की या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला आण त्याच्या एक दिवसानंतर तिला ज्या लाइफ सपोर्ट सिस्टम ठेवण्यात आले होते ते काढून टाकण्यात आले. त्यानंतर तिने जगाचा निरोप घेतला. बेनसनचा पती डेलाइ बेनसनने त्यांच्या बाळाचे एक छायाचित्रे
फेसबुकवर पोस्ट केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आण जाणून घ्या याविषयी अधिक माहिती...