आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Brave Waiter Michael Garcia Who Apposed Cruel Comment Of Customer On Innocent Boy

रेस्तरॉचा हा वेटर अमेरिकेमध्ये बनला हीरो, चिमुकल्यासाठी दाखवली होती हिम्मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेमध्ये मायकल गेर्शिया नावाचा एक वेटर सध्या सर्वांचा हीरो बनला आहे. ज्या कामासाठी हिम्मत आणि शक्तीशाली व्यक्तीची गरज पडते असे काम त्याने केले आहे. त्यासाठी त्याला हॉटेल कर्मचा-यांनी साथ दिली होती. झाले असे, की काही दिवसांपूर्वी ह्यूस्टनच्या लॉरेन्जॉस रेस्तरॉमध्ये किम कॅसिलोचे कुटुंबीय 5 वर्षीय मुलगा मिलोसोबत जेवण करत होते.
मिलो मानसिकरित्या अस्वस्थ होता. त्यांच्या टेबलजवळ इतर लोक येऊन बसले. काही वेळानंतर त्यांनी मिलोवर काही वाईट कमेन्ट्स करायला सुरूवात केल्या. ही वागणून त्याच्या कुटुंबीयांना आवडली नाही. परंतु तरीदेखील ते शांत बसले. वेटर मायकलने हा प्रकार बघितला आणि त्या लोकांच्या जवळ जाऊन म्हणाला, 'तुम्ही अशाप्रकारे कसे बोलू शकतो. तुम्हाला दिसत नाही तो छोटा मुलगा आहे, त्याच्या कुटुंबीयांना आणि त्याला तुम्ही अशाप्रकारे अपमानित करू शकत नाही...मला माफ करा सर तुमच्या अशा वागण्यामुळे मी तुम्हाला जेवण वाढवू शकत नाही.' त्यानंतर त्या कमेन्ट्स करण्या-या लोकांनी मायकलची तक्रार हॉटेलच्या मालकाकडे केली. परंतु हॉटेल मालकाने मायकलला साथ दिली. तो म्हणाला, की हा वेटर खरं बोलतोय आणि तुम्ही चुकीचे.
शेवटी त्या लोकांना अपमानित होऊन हॉटेलच्या बाहेर जावे लागले. तिथे उपस्थित लोकांनी मायकलची प्रशंसा केली. मायकल गेल्या दोन वर्षांपासून लॉरेन्जॉस हॉटेलमध्ये काम करत आहे. या हॉटेलमध्ये मिलो अनेकदा त्याच्या कुटुबीयांसोबत जेवण करण्यासाठी येतो. तो सर्व वेटर्सचा आवडता मुलगा आहे. या घटनेची माहिती हॉटेल मालकाने आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केली. त्याला अनेक कमेन्ट्स आणि प्रशंसा मिळाल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा या घटनेसंबंधीत छायाचित्रे...