आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तुरुंगात चालते कैद्यांचे राज्य, टॅक्स न दिल्यास होते गँगरेप-मर्डर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रासिलिया - जगातील सर्वात धोकादायक तुरुंगांमध्‍ये आफ्र‍िकेतल्या गीताराम मध्‍यवर्ती कारागृहाचा समावेश होतो. मात्र ब्राझीलमधील पेरनाम्बुको तुरंगही याबाबतीत मागे नाही. येथे कैद्यांवर सामुहिक बलात्कार करुन त्यांची हत्याही केली जाते. सोशल साइट्सवर या तुरुंगाची छायाचित्रे व्हायरल होत आहेत. कैद्यांकडे आहे सुरक्षेची जबाबदारी...
या तुरुंगाच्या सुरक्षेची जबाबदारी कैद्यांवर आहे. यांच्यावर अंमली पदार्थांची तस्करी, हत्या आणि सामुहिक बलात्काराचा आरोप आहे. या कैद्यांकडे सर्व तुरुंगाच्या सर्व सेल्सच्या चाव्या आहेत. यामुळे हे इतर कैद्यांवर अत्याचार करतात. यांना की-होल्डर्स म्हटले जाते. इतकेच नव्हे सामान्य कैद्यांना जिवंत राहण्‍यासाठी या तुरुंगात टॅक्स द्यावा लागतो. जो कैदी टॅक्स देणार नाही त्याच्यावर सामुहिक बलात्कार आणि मारहाण केली जाते. नंतर त्यांची हत्याही केली जाते. नुकतेच ह्युमन राइट वॉचने या तुरुंगाच्या आतील छायािचत्रे जारी केले आहेत. एका तुरुंग अधिका-याने सांगितले, की ज्या कैद्यांवर हत्या, सामुहिक बलात्काराचा आरोप आहे अशांकडे तुरुंगाच्या सुरक्षेची जबाबदारी दिली जाते. यामुळे सामान्य कैद्यांना यांची भीती राहते व ते कायदे तोडत नाही.
एका सेलमध्‍ये अनेक कैदी
तुरुंगाच्या आत दुर्बल कैद्यांना एकाच सेलमध्‍ये बंद केले जाते. जर विरोध केल्यास त्यांना मारहाण केली जाते. दुसरीकडे तुरुंगाची देखरेख करणारे कैदी आरामदायी आयुष्‍य जगतात. त्यांच्यासाठी फ्रीज, टीव्हीचीही व्यवस्था केलेली असते. इतर कैद्यांशी नौकरांप्रमाणे व्यवहार करतात.
तुरुंगाच्या बाहेरुनही घेतात टॅक्स
तुरुंगात सुरक्षा कर्मचारी तर आहेत. मात्र खरे चालते ते कैद्यांची. ते लहान मोठे शिक्षा भोगणा-या लोकांकडून टॅक्स घेतात आणि न दिल्यास जीवे मारण्‍याची धमकी देतात. इतकेच नव्हे ते कैदी तुरुंगाबाहेरील कुटुंबीयांकडून पैसे घेतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा या तुरुंगाच्या आतील छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...