आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Breathtaking Parallel Worlds By Karezoid Michal Karcz

कधी भयावह वाडा तर कधी अॅनाकोंडावर बसलेली तरुणी, पाहा कशी केली फोटोग्राफी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पोलांडचा फोटोग्राफर मायकल क्रेजने काढलेले छायाचित्र)
सुनसान गुहा, चौहूबाजुंनी खडक, या खडकांमधून सळसळ चालणारा अॅनोकोंडा आणि त्यावर बसलेली एक तरुणी. तसेच, आणखी एक भीतीदायक दृश्य, एक भयावह वाडा आणि खडकांमधून रस्ता शोधणारी एक महिला. विचार करा असे, काही भयावह दृश्य आठवले जरी तरी आपल्याला घाम फुटतो. मात्र हे वास्तवात नसून रुसच्या एका फोटोग्राफरने केलेली पेंटीग्स आहेत. पोलांडचा फोटोग्राफर मायकल क्रेजच्या या छायाचित्रांतून खूपच भयावह दृश्य उमटते. ही छायाचित्रे वास्तवातील स्थितीवर काढलेली असल्याचाही भास होतो.
पोलांडमध्ये जन्मलेल्या मायकलला बालपणीपासूनच फोटोग्राफीचा शौकी आहे. शाळेत शिक्षण घेत असतानासुध्दा तो फोटोग्राफी करत होता. त्याला कॅमे-याच्या लेन्समधून जगभरातील सौंदर्य पाहण्याची आवड आहेत. हळू-हळू त्याला फोटोग्राफीमध्ये विविध तंत्रज्ञानाचा तो वापर करतो. त्यानंतर त्याने पेंटीग्ससह फोटोग्राफीला मिक्स करून नवीन प्रयोग केला. तो विविध नजा-यांना आपल्या कॅमे-यात कैद करतो. त्यानंतर त्या छायाचित्रांना पेंटीग्ससह डिजिटल आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने मिक्स करतो. या तंत्रज्ञानातून एक अद्भूत फोटो समोर येतात.
मायकलचे म्हणणे आहे, की तो स्वप्नांत अशा दृश्यांची कल्पना करतो आणि त्यांना वास्तवात आणण्याचा प्रयत्न करतो. फोटो क्लिक करण्यापूर्वी तो आपल्या डोक्यात एका फोटोची कल्पना करतो. त्यानंतर अशा नजा-यांच्या शोधात निघतो. फोटोंना मॅच करणा-या पेंटीग्ससोबत सॉफ्टवेअरच्या मदतीने मिक्स करतो. या तंत्रज्ञानाने एक उत्कृष्ट फोटो समोर येतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पोलांडच्या फोटोग्राफरचे असेच अनोखे फोटो...