आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bride Sitting In The Mare Turned Out, So Everyone Left Him Behold

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेव्हा नवरी घोड्यावर बसून येते, उपस्थितांना बसतो ४४० व्होल्टचा धक्का!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर (मध्य प्रदेश)- जर एखादी नवरी मुलगी सजून धजून मेण्यात बसून येण्याऐवजी चक्क घोड्यावर बसून आली तर उपस्थितांना आश्चर्याने ४४० व्होल्टचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. परंतु, इंदौरमध्ये अशीच एक अविश्वसनीय घटना घडली आहे. एक नवरी चक्क घोड्यावर बसून आल्याचे बघून रस्त्यालाही डोळे फुटले होते. यावेळी घोड्यासमोर बॅंड-बाजा आणि सोबत नातलगांची मांदियाळीही होती हे विशेष.

यासंर्दभात नवरीचे वडील देवेंद्र इनानी यांनी सांगितले, की १९९० मध्ये माझे लग्न राजस्थानमधील निम्बाहेडा येथे झाले. तेव्हा माझी पत्नी राधादेवी हिची परंपरेनुसार बंदुरी काढण्यात आली होती. बंदुरी काढताना नवरी मुलगी सजून धजून घोड्यावर बसून येते. यावेळी सोबत बॅंड-बाजाही असतो आणि नातलगांची सोबतही असते. त्यामुळे उपस्थितांना धक्का बसतो. मुलीची वरात कशी काय काढली, असा प्रश्नही पडतो. आता १८ जुलै रोजी माझ्या मुलीचे लग्न आहे. पत्नीच्या इच्छेनुसार आम्ही मुलीची बंदुरी काढली आहे.

मध्य प्रदेशात पहिल्यांदाच वैश्य समाजामध्ये एखाद्या मुलीची बंदुरी काढण्यात आली आहे.

बंदुरीची अधिक छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा