आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bright Lights, Big City: Haunting Photographs Show The Lonely Beauty Of Life

मुंबईसह जगभरातील व्यस्त शहरे दिसतात असे, फोटोग्राफरने क्लिक केले PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(एका महिला फोटोग्राफरने मोठ्या शहरातील एकट्या लोकांना आपल्या फोटोंमध्ये क्लिक केले आहे)
न्यूयॉर्क- उजळ प्रकाश, उंच इमारती, व्यस्त शहर आणि त्यामध्ये एकातांत राहणारे लोक. एका महिला फोटोग्राफरने जगातील काही सर्वात व्यस्त शहरातील एकाकी जाणवणा-या लोकांचे फोटो कैद केले आहेत. तिने खूप दूरुन हे फोटो काढले आहेत. त्यामध्ये शहराचे सौंदर्य आणि त्या फ्रेममध्ये कुठेतरी उभे, झोपलेले आणि बसलेले लोक दाखवले आहेत. फ्लोरिआने डी लासी 2004पासून अशाप्रकारचे फोटो क्लिक करण्याच्या प्रोजेक्टवर काम करत होती.
'मोठ्या शहरातील लोक असतात सर्वात एकाकी'
फ्रान्सची रहिवासी फोटोग्राफरचे म्हणणे आहे, की खेडेगावापेक्षा मोठ्या शहरात राहणा-या लोक एकाकी आयुष्य जगत असतात. असेच एकाकी आयुष्य जगणा-या काही लोकांचे फोटो क्लिक करण्यासाठी फोटोग्राफरने जगातील अनेक मोठ्या शहरांचा दौरा केला. त्यामध्ये मुंबई, पॅरिस, बिजींग, मॉस्को, मकाओ, टोक्यो, इस्तांबुलसह अनेक शहरे सामील आहेत. परंतु विशेष गोष्ट अशी, की फोटोग्राफरला प्रत्येक शहरात एकाकी आयुष्य जगणारे लोक सहज मिळाले.
सर्वात पहिले न्यूयॉर्कमध्ये झाला अनुभव
ही महिला जेव्हा न्यूयॉर्कच्या एका इमारतीत चौथ्या मजल्यावर राहत होती, तेव्हा तिला एकटेपणा जाणवत होता. त्यानंतर ती खिडकी किंवा बाल्कनीच्या आसपास उंच इमारती आणि घरे पाहायची. यावेळी तिला विचार आला, की माझ्यासारखे अनेक लोक या जगात असतील. नंतर तिने अशा लोकांचे फोटो क्लिक करण्याचा विचार केला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा महिला फोटोग्राफरने क्लिक केलेले एकाकी आयुष्य जगणा-या लोकांचे PHOTOS...