आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Britain's Most Tattooed Man Mathew Whelan, 34 Rejected For A New Passport

ब्रिटनच्या 'टॅटू किंग'चे विचित्र नाव ठरले अडचण, पासपोर्ट होत नाहीये रिन्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मैथ्यू व्हीलनला (वय 34) ब्रिटनचा सर्वात मोठा टॅटूमॅन मानले जाते. इतका लोकप्रिय असताना देखील याला पासपोर्ट मिळत नाहीये. झाले असे, की मैथ्यूने 2007 आणि 2009मध्ये दोन वेळेस नाव बदलेले आहे. आता सध्या त्याचे नाव 'किंग ऑफ इंक लँड किंग बॉडी आर्ट दा एक्स्ट्रीम इंक-एलटे' आहे. ( 'King of Ink Land King Body Art The Extreme Ink-Ite'). परंतु त्याचे हे नाव पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी अडथळा निर्माण करत आहे.
मैथ्यूने त्याच्या ड्राइविंग लाइन्सची एका प्रतसोबत पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी पाठवले होते. लाइन्सच्या प्रतमध्ये तो विचित्र अवतारात दिसत होता. त्याने पोसपोर्ट रिन्यूसाठी 72.50 पाउंड फिससुध्दा पाठवली होती.
मैथ्यूने जवळपास 25 हजार पाउंड(25 लाख 75 हजार) खर्च करून त्याच्या शरिरावर 90 टक्के भागात टॅटू गोंदले आहेत. एवढेच नाही तर त्याने त्याच्या डोळ्यावरसुध्दा टॅटू गोंदून घेतला आहे.
त्याला परदेशात कामाची ऑफर मिळाल्याने तो परदेशात जाण्याची तयारी करत होता. त्याला बॉडी मोडिफिकेशनच्या क्षेत्रात एमओडी वर्ल्ड इंटरनॅशनल नावाच्या संस्थेकडून ही ऑफर देण्यात आली होती.
मैथ्यूने सांगितले, की 'त्याने पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी पाठवले होते. त्याला पासपोर्ट अधिका-यांचा फोन आला. अधिका-यांनी सांगितले, पॉलिसीच्या अंतर्गत त्यांनी निवेदनावर विचार केला आहे आणि त्यांनी दुसरे सरकारी कागदपत्र मागितले आहेत. परंतु त्यानंतर 15 जानेवारीला मला एक पत्र आले, ज्यामध्ये सांगितले आहे, की पासपोर्ट रिन्यू केले जाऊ शकत नाही कारण माझे नाव असामान्य आहे.'
मैथ्यू त्याचा पासपोर्ट रिन्यू करण्याच्या संघर्षाला मानवी हक्काशी जोडत आहे. त्याच्या मते, हे मानवाधिकारचे उल्लंघन आहे. तेथील स्थानिक खासदार जॉन हॅमिनिंगसुध्दा त्याला हक्क मिळण्यासाठी लढत आहेत.