आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • British Photographer Shows Life Of Monkey Hunters Who Survive In Most Difficult Situation

डोळ्यांची पापणी लवण्याआधी शिकारीवर मारतात झडप, अशी आहे या आदिवासींची LIFE

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात फक्त 4 हजार हुऔरिन आहेत. ते झुंडीने राहातात. - Divya Marathi
जगात फक्त 4 हजार हुऔरिन आहेत. ते झुंडीने राहातात.
साऊथ अमेरिकेच्या इक्वाडोरच्या घनदाट जंगलामध्ये राहाणे म्हणजे खायचे काम नाही. येथील हुऔरिन आदिवासी फक्त त्यांच्या वेगामुळे येथे राहू आणि जगू शकतात. ब्रिटीश फोटोग्राफर पॅट ऑक्सफोर्ड याने जंगलात जाऊन त्यांची लाइफ कॅमेरात कैद केली आहे. 
 
जमीनीवरुन करतात हवेतील शिकार 
- हुऔरिन ट्राइबकडे घनदाट जंगलामध्ये खाण्या-पिण्याची व्यवस्था करणारी फार कमी साधन-सामुग्री असते.  
- त्यामुळे त्यांना प्रत्येक शिकारीकडे लक्ष ठेवावे लागते. हे आदिवासी जमीनीवर उभे राहून भल्यामोठ्या पाइपच्या मदतीने शिकारीवर हल्ला करतात. त्यामुळे आकाशात उडणाऱ्या पक्षांचीही त्यांना शिकार करता येते. 
- ही आदिवासी जमात वेगवान आणि चपळ असते. यामुळे झाडांवर झपझप चढणे त्यांना शक्य होते. 
- अवघड कामांमुळे यांचे पाय फार पसरट झालेले असतात. यांच्यातील बुहतेकांना सहा बोटे असतात. यांच्या आयुष्यात अनेक आव्हाने आहेत, मात्र तरीही ते जंगल सोडायला तयार नाहीत. 
 
जगात फक्त 4 हजार हुऔरिन 
- हुऔरिन आदिवासींची लोकसंख्या फार कमी आहे. जगात फक्त 4 हजार हुऔरिन आहेत. ते झुंडीने राहातात. 
- सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे या जमातीतील प्रत्येक जण एकमेकांना ओळखतो. या 4 हजार हुऔरिन लोकांची पर्सनली ओळख आहे. 
- आता यांच्या जंगलावर बाहेरचे लोक आक्रमण करु लागले आहेत. येथे असलेले तेलाचे भंडार आधुनिक जीवनशैलीसाठी फार उपयुक्त असल्याने लोक त्यांच्या मुळनिवासावर आक्रमण करत आहेत. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, किती कठीण आहे यांचे जीवन... 
बातम्या आणखी आहेत...