आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Brown Tree Snake Was Found Dead Still Biting Its Neck

हे विषारी साप करतात आत्महत्या? स्वत:चा चावा घेतल्याने मरण पावला हा साप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(स्वत:च्या गळ्याला पडकलेला साप)
जगभरात अनेक विषारी सापांच्या प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात. हे विषारी साप कुणाचाही क्षणांत जीव घेऊ शकतात. तुम्ही कधी ऐकले आहे का, साप स्वत:च्या विषानेच स्वत:ता जीव घेतो. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, परंतु असे घडले आहे. ऑस्ट्रेलियाच्या केर्न्स शहरात ही घटना घडली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या केर्न्सचा रहिवासी स्नेक कॅचर मॅट हॅगनने डेली मेल ऑस्ट्रेलियाला सांगितले, ती शनिवारी (8 नोव्हेंबर) मी एका विषारी सापाला पाहिले. तो आपल्याच गळ्याला तोंडात पकडून बसलेला होता. त्याने स्वत:चा चावा घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. हॅगनने सांगितले, की केर्न्सच्या जवळ राहण-या एका महिलेनेसुध्दा 1.5 फुट लांब ब्राऊन टी सापाला अशाचप्रकारे मरताना पाहिले.
हॅगनने सांगितले, की मी जेव्हा एक ब्राऊन टी स्नेकला पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो आपल्या गळ्याला चावा घेण्याचा प्रयत्न करत होता. जेणेकरून त्याला आत्महत्या करता येईल. साप पकडण्याच्या कामाला मला 10 वर्षे उलटून गेलीत. मात्र स्वत:चा चावा घेऊन आत्महत्या करणारे असे साप मी कधीच पाहिले नव्हते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हँगनने सापाला पकडल्यानंतर तो कसा अस्वस्थ होतोय. हा साप स्वत:च्या गळ्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे...