(म्हशीच्या रेडकूवर हल्ला करताना सिंह.)
सिंह मोठ-मोठ्या प्राण्यांना मात देतात, सहजरित्या शिकार करतात. परंतु काही वेळेस हे शक्य होत नाही. अलीकडेच असा एक प्रसंग घडला. सिंहांना म्हशीच्या रेडकूची शिकार करता आली नाही. दक्षिण अफ्रिकेच्या क्रूगर नॅशनल पार्कमध्ये ही घटना घडली. दोन सिंहांनी जेव्हा एका म्हशीच्या रेडकूवर हल्ला करून शिकार बनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा डझनभर म्हशींनी एकत्र येऊन सिंहांवर हल्लाबोल केला. म्हशींनी पलटवार केल्यानंतर सिंहांनी रेडकूला सोडून दिले आणि तेथून पळ काढला.
क्रूगर नॅशनल पार्कमध्ये म्हशींचा कळप एकत्र जात होता. यावेळी म्हशीचे एक रेडकू मागे राहिले. सिंहांनी याचा फायदा घेत त्याच्यावर हल्ला केला. सिंहांनी अचानक हल्ला केल्याने सर्व म्हशी सैरावैरा पळायला लागल्या. मात्र एक रेडकू त्यांच्या तावडीत सापडले. त्याचा जीव वाचवण्यासाठी एका म्हशीने सिंहांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. या म्हशीच्या हिमतीला साथ देत सर्व म्हशीच्या कळपाने सिंहांवर हल्लाबोल केला. म्हशींना घाबरून सिंह मागे सरसावले. तिथून पळ काढला. या घटनेची छायाचित्रे दक्षिण अफ्रिकेचा फोटोग्राफर वान रंसबर्गने कॅमेऱ्यात कैद केली आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा म्हशींनी एकचवेळी कसा केला सिंहांवर हल्लाबोल आणि वाचवला आपल्या रेडकूचा जीव...