आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हे दृश्य पाहून उडेल थरकाप, शिकार करण्याच्या नादात दोघांनी गमावला जीव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जंगलातील कोणत्याची प्राण्याची सिंह चटकन शिकार करू शकतो. पण जेव्हा त्याची चाल त्याच्यावरच उलटते, तेव्हा मात्र जीव वाचवण्यासाठी त्याला धडपड करावी लागते. असेच काही दक्षिण आफ्रिकेच्या जांबियाच्या दक्षिण लुआंगवा नॅशनलस पार्कमध्ये घडले. या घटनेची सर्व छायाचित्रे मॅट आर्मस्ट्रँगने काढली. या परिसरात तो सफारी गाईडचे काम करतो.
सिंहाने जंगली म्हशीची शिकार करण्यासाठी धाव घेतली. मात्र म्हशीने त्याच्यावर पलटवार केला. हे दृश्य थरारक होते. भीती उत्पन्न करणारे होते. दोन्ही प्राण्यांनी एकमेकांवर जिवघेण्या जखमा होईपर्यंत हल्ले केले. सिंहाने शिकारीसाठी जोरदार हल्ला चढवला होता. म्हशीने सिंहाचे तोंड आपल्या तोडांत दाबून धरले. सिंहाच्या तोंडाला जखम झाली आणि रक्तस्त्राव सुरु झाला. त्यानंतर म्हशींचा कळप जमला. त्यांनी जखमी सिंहावर हल्ला केला. या सिंहाने माघार न घेता म्हशींच्या कळपावर हल्लाबोल केला. पण त्याला जबर जखमा झाल्या. त्यातून मोठा रक्तस्त्राव सुरु झाला. अखेर काही वेळाने सिहांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, सिंहाने हल्ला केलेल्या जंगली म्हशीचादेखील मृत्यू झाला.
सिंह शिकारीचा प्रयत्न करतो तेव्हा एकतर सिंह शिकार करतो किंवा शिकार होणारा प्राणी तरी पळण्यात यशस्वी होतो. मात्र ही घटना जरा विचित्र घडली. यात दोन्ही प्राण्याचा जीव गेला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या शिकारीची थरकाप उडवणारी छायाचित्रे...