आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Caiman Manages To Win Fight For Life With Jaguar After It Is Pounced On In Brazilian River

जखमी मादी बिबट्याने मगरीला केले बेहाल, थोडक्यात बचावला जीव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मगरीची शिकार करताना मादी बिबट्या)
भयावह मगर मोठ-मोठ्या प्राण्यांची शिकार एका क्षणात करते. मग तो सिंह असो अथवा शार्क मासा. मगरीपुढे कुणाचेच काही चालत नाही. मात्र या प्राण्याला कधी-कधी हार मानावी लागते. अशीच एक घटना ब्राजीलच्या पँटानल क्षेत्रात घडली. एक मादी बिबट्याने जखमी असतानाही मगरीचे बेहाल केले. थोडक्यात तिचा जीव वाचला.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, की या बिबट्याने पाण्यात शिरून मगरीवर मात केली.
बिबट्याने मगरीवर झडप मारली. मगरीने स्वतःला सोडवून घेण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र तिला हार मानावी लागली. मादी बिबट्याने आपल्या पंजाने मगरीला पकडले. टोकदार नखे तिच्या शरीरात घुसवली. पण अखेर बिबट्याच्या तावडीतून सुटण्यात मगर यशस्वी झाली.
मादी बिबट्या आणि मगर दोघेही एकमेकांची शिकार करण्यासाठी चढा-ओढ करत होते. या क्षणाची छायाचित्रे क्रिस ब्रुंसकिलने कॅमेऱ्यात कैद केली आहेत. ब्रुंसकिलनने सांगितले, की दोन्ही प्राण्यांनी एकमेकांवर झडप घातली. त्यावेळी मी त्यांची पाच छायाचित्रे क्लिक केली. ब्रुंसकिलने सांगितले, की मादी बिबट्या आधीच जखमी होती. त्यावेळी तिची नजर मगरीवर पडली. ही मगरदेखील तिच्या दिशेने जात होती. मादी मगरीने हिंसक रुप धारण केले आणि तिच्यावर जोरदार हल्ला केला.
ही घटना ब्राजीलच्या पँटानल रीजनमधील बँक्स ऑफ द पिक्यूरी नदीमध्ये घडली. यापूर्वीसुध्दा या नदीत मगर आणि बिबट्यामधील भांडणाची छायाचित्रे समोर आलेली आहेत. या परिसरात जवळपास 4 ते 7 हजार बिबटे राहतात. कधी-कधी शिकारीसाठी ते आपसातसुध्दा भिडतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा क्रिस ब्रुंसकिलने क्लिक केलेली मगर आणि मादी बिबट्याची छायाचित्रे...