आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीडशे वर्षांपासून घराच्या मागे जमिनीत दडले होते 8 हंडे; एका दिवसात फळफळले दाम्पत्याचे नशिब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका रात्रीतून नशिब फळफळले...रोडपती झाला करोडपती... अशा घटना तुम्हीही ऐकल्या
असतीलच. मात्र हे तुमच्याबाबतीत घडू शकते, असे आम्ही सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. तसेच कोट्याधिश बनण्यासाठी लॉटरीचे तिकीट खरेदी करणे गरजेचे नसते तर त्यासाठी सजग राहाणे महत्त्वाचे असते.

आज आम्ही आपल्यासाठी एका दामप्त्याची कहाणी घेऊन आलो आहोत. त्याच्या घराच्या मागे एका झाडाखाली दीडशे वर्षांपासून कोट्यावधी रुपयांचा खजिना दडलेला होता. परंतु त्यांना त्याकडे लक्ष दिले नाही आणि अचानक त्यांचे लक्ष या खजिन्यावर पडल्यानंतर त्यांना प्रचंड धक्काच बसला.

कॅलिफोर्नियात राहाणारे हे दाम्पत्य फेब्रुवारी 2016 मध्ये चर्चेत आले होते. हे दाम्पत्य मागील अनेक वर्षांपासून या घरात राहात होते. एके दिवशी कुत्र्यासोबत फेरफटका मारताना या दाम्पत्याचे लक्ष झाडाखाली चकाकणार्‍या वस्तूकडे गेले. यापूर्वी हे दाम्पत्य या झाडाखालून अनेकदा गेले होते, परंतु त्यांचे कधी या वस्तूकडे लक्ष गेले नव्हते. दोघांनी माती बाजूला केली असता त्यांना जमिनीत आठ अॅल्युमिनियमचे हंडे दिसले. जमिनीतील हंडे त्यांनी बाहेर काढले असता त्यात सोन्याची नाणे होते. हे पाहून त्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. त्यांनी प्रसंगाचे भान ठेवून सोन्याने भरलेले हंडे घरात नेले. नंतर त्यांनी स्थानिक जाणकारांना बोलावून त्यामागील सत्य जाणून घेतले.

दाम्पत्याला काय मिळाले...?
- दाम्पत्याला सापडलेल्या हंड्यांमधून 1,427 सोन्याचे नाणे मिळाले.
- सर्व नाणे 1847 ते 1894 दरम्यानची होती.
- नंतर या दाम्पत्याने पुरातन नाणे विकून कोट्यावधी रुपये कमावले.
- मीडिया आणि पोलिस चौकशीचा ससेमिरा मागे न लागण्यासाठी या दाम्पत्याने आपली ओळख लपवून ठेवली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... दाम्पत्याला सापडलेल्या खजिन्याचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...