अमेरिकेसह अनेक देशात 31 ऑक्टोबरला हॅलोविन हा सण साजरा होतो. यासाठी लोकांनी आतापासूनच सणासाठी तयारी सुरू केली आहे. यात मुलांसमवेत मोठी माणसेही चित्रविचित्र वेश परिधान करून भीती वाटावी असा मेकअप करतात. या सणासाठी कॅलिफोर्नियातील शेतकरी टोनी डिगरा यांनी भोपळ्याचा आकार बदलला आहे. आकार बदलण्यासाठी लागणारे 60 लाख रुपये किंमतीचे यंत्र त्यांनी विकत घेतले. त्यामुळे भोपळ्याला विशिष्ट आकार देता येतो.
टोनी यांनी सांगितले की, भोपळ्याचा आकार त्यांनी १८१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या फ्रँकनस्टेनमधील काल्पनिक पात्र व्हिक्टर फ्रँकस्टेन या भीतिदायक पात्रासारखा आहे. अशा प्रकारचे भोपळे लोकांना इतके आवडतील की, वर्षभरात या मशीनची किंमत वसूल होईल, असा दावा त्यांनी केला आहे.
या भाज्यांना आकार देण्यासाठी त्यांची देखभाल करणे खूप जरुरी असते. त्यांना योग्यवेळी मोल्डिंगमध्ये टाकावे लागते. तेव्हाच विशिष्ट आकार प्राप्त होऊ शकतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा भाज्यांना कसा दिला विविध आकार...