आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडीलांच्या 72 बायकांशी केले लग्न, या राजेंना एकूण 100 बायकांपासून आहेत 500 मुले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध्य आफ्रिकेतील देश कॅमरुनच्या बफुट परिसरातील राजे एबुंबी-2 यांना सुमारे 100 बायका आहेत. विशेष म्हणजे यातील 72 बायका त्यांच्या वडीलांच्याही बायका होत्या. स्थानिक परंपरेनुसार वडीलांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या बायका मुलाला मिळतात. त्याला त्या स्विकाराव्याच लागतात.
कॅमरुनमध्ये बहुपत्नी परंपरेच्या कायद्याला मान्यता आहे. त्यामुळे या देशातील ग्रामीण भागात एखाद्या व्यक्तीला अनेक पत्नी असणे सामान्य आहे. 1968 मध्ये एबुंबी-2 यांच्या वडीलांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना बफुट राज्याचे राजे घोषित करण्यात आले. त्यांचे आता सुमारे 500 मुले आहेत.
या राज्याच्या तीसऱ्या पत्नीने बोलताना सांगितले, की प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे निष्ठावान पत्नीचा हात असतो. येथील परंपरेनुसार एखाद्या व्यक्तीच्या वयाने कमी असलेल्या पत्नीला वयाने जास्त असलेल्या पत्नीकडून संस्कार घ्यावे लागतात. शिवाय राजालाही हे संस्कार दिले जातात.
राजाच्या बायका चर्चा करण्यात निष्णात असतात. त्यांना अनेक भाषांची माहिती असते. आता या देशातही बहुपत्नी परंपरेला विरोध होत आहे. तरीही राजाचे म्हणणे आहे, की देशातील परंपरा कायम राखणे माझे कर्तव्य आहे. माझ्या सर्वच बायका माझ्यासाठी खास आहेत. मी त्यांच्यात भेद करीत नाही.
पुढील स्लाईडवर बघा, राजा एबुंबी-2 आणि त्यांच्या बायकांचे फोटो.... यातील काही त्यांच्या वडीलांच्याही बायका होत्या...
बातम्या आणखी आहेत...