चिनी हुकूमशहा माओत्से तुंग यांचे हे चित्र 77 कोटी रुपयांत लिलावात विकण्यात आले आहे. मागील लिलावापेक्षा यंदा या चित्राला 18 पटींनी अधिक किंमत मिळाली आहे. लंडनमधील सोथेबीच्या हाऊसमध्ये या गडद लाल रंगातील चित्राचा लिलाव झाला असून अमेरिकेतील पॉप आर्टिस्ट अँडी वारहोल यांनी ते काढले आहे. त्यांनी लाल आणि पिवळा रंग हा माओच्या काळात चीनमध्ये आलेल्या क्रांतीच्या रूपात दर्शवला आहे. चिनी सरकारच्या नियमांमुळे हे चित्र खरेदी करणार्याचे नाव जाहीर करण्यात आले नाही.