आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे 1 रात्र घालवण्यासाठी खर्च करावे लागतात 22 लाख, कार्दशियन बहिणींचा फेव्हरेट स्पॉट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Casa Aramara आणि इन्सेटमध्ये कार्दशियन बहिणी. - Divya Marathi
Casa Aramara आणि इन्सेटमध्ये कार्दशियन बहिणी.

मॅक्सिकोमधील 12 बेडरूम आणि 13 बाथरूम असलेल्या Casa Aramara व्हिलामध्ये एक रात्र थांबण्यासाठी 22 लाख रुपये भाडे द्यावे लागते. याच व्हिलामध्ये अमेरिकन एक्स्ट्रेस आणि सुपरमॉडेल किम कार्दशियन आणि तिच्या बहिणी भरपूर मौजमस्ती करतात. हा व्हिला त्यांचा खास मित्र Joe Francis चा होता.


आता येऊ शकत नाहीत कार्दशियन बहिणी...
- जो फ्रान्सिस पेशाने बिझनेसमन आणि फिल्म प्रोड्युसर आहे. त्याच्या एका पार्टनरने फ्रान्सिसला बिझनेस अकाउंटचे पैसे काढून स्वतःचे घर मेंटेन ठेवण्यासाठी वापरत असल्याच्या आरोपाखाली कोर्टात खेचले. त्यानंतर कोर्टाने फ्रान्सिसला 2 मिलियन डॉलर आपल्या पार्टनरला देण्याचे आदेश दिले आणि त्याचा मालकी हक्कही काढून घेतला आहे. यामुळे आता फ्रान्सिसच्या मैत्रिणी कार्दशियन बहिणी आता येथे फ्रीमध्ये पार्टी पाहण्यासाठी जाऊ शकत नाहीत.


- जो फ्रान्सिसची आर्थिक अडचण पाहून कोर्टाने या आलिशान व्हिलाच्या माध्यमातून येणारे भाडे पार्टनरला 2 मिलियन डॉलरची भरपाई होईपर्यंत देण्याचे आदेश दिले आहेत. 

 

22 लाख रुपये एका रात्रीचे भाडे
- जो फ्रान्सिस आपले मित्र आणि किम कार्दशियन बहिणीसोबत येथे मोठमोठ्या पार्ट्या करत होता. रिकाम्या वेळेत हा व्हिला भाड्याने देत होता. येथे एक रात्र घालवण्यासाठी 35000 डॉलर्स (22 लाख रु) भाडे ठेवले होते.


पुढील स्लाईड्सवर पाहा, यांचे इतर काही खास फोटो...

बातम्या आणखी आहेत...