आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: लग्नानंतर असे काय घडले, की या वधूला करावे लागले असे कृत्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- रंगवलेल्या वेडिंग ड्रेसमध्ये शेल्बी)
लग्न आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करते. परंतु लग्नाच्या काही दिवसांतच वैवाहित आयुष्यात दु:ख आले तर आपण खचून जातो. मात्र आपल्याला आलेल्या समस्येला तोंड द्यावेच लागते. असेच एक उदाहरण, मेम्फिस, टेनेसी (संयुक्त राज्य अमेरिका)ची रहिवासी शेल्बी स्वीइंकचे आहे. लग्नानंतर काही दिवसातच, तिच्या पतीने तिला सोडून दिले. मात्र, शेल्बी दु:खात बुडून न जाता तो क्षण आनंदात साजरा केला. तिने हा क्षण आनंदी साजरा करण्यासाठी एक भन्नाट शक्कल लढवली.
शेल्बी आणि तिच्या बॉयफ्रेंड यांचे मागील तीन वर्षांपासून अफेअर होते. दोघांनी घरच्यांच्या सहमतीने लग्न केले. मात्र लग्नाच्या पाच दिवसांनंतर तिचा पती तिला सोडून निघून गेला. पती आपल्याला सोडून गेल्याचे शेल्बीला दु:ख झाले मात्र, तिने ते पाळून न ठेवता, तो क्षण आनंदाने जगण्याचा निर्णय घेतला.
शेल्बीने आपला वेडिंग ड्रेस परिधान करून त्यावर अनेक रंग उडवले. शेल्बीचे कृत्य पाहून तिच्या कुटुंबीयांनीसुध्दा ही संधी सोडली नाही. त्यांनीसुध्दा हा क्षण आनंदात साजरा केला. सर्वांनी मिळून शेल्बीच्या आणि स्वत:च्या ड्रेसवर रंग उडवला. त्यानंतर या ड्रेसला मेम्फिसच्या एका स्टोअरमध्ये डिस्प्ले करण्यात आले. शेल्बीनं सांगितले, की मी जेव्हा माझ्या ड्रेसवर रंग उडवला तेव्हा मला स्वतंत्र झाल्यासारखे वाटले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दु:खाचा क्षण आनंदाता साजरा केलेल्या शेल्बीची छायाचित्रे...