आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या महायुद्धात चार्ली चॅप्लिनचा मदत गोळा करण्याचा अनोखा मार्ग, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण हावभावामुळे जगाला हसवणारा प्रसिद्ध विनोदी अभिनयसम्राट चार्ली चॅप्लिनने पहिल्या महायुद्धाच्या वेळी मदत गोळा करण्यासाठी चकित करून सोडणारे प्रयोग करत असे. तो एप्रिल 1918 मध्ये न्यूयॉर्कमधील जॉर्ज वॉशिंग्टनच्या पुतळ्याजवळ गेला. तेथे त्याला पाहण्यासाठी हजारो लोक उभे ठाकले होते. तेथे चार्लीसोबत त्या काळातील प्रसिद्ध अभिनेते डग्लस फेअरबँक्स उपस्थित होते. तो पहिल्या महायुद्धाचा कठीण काळ होता. गरजू लोकांपर्यंत पैसे पोहोचवण्यासाठी चॅप्लिनने लिबर्टी बाँड विकले होते.
त्याच्यासमवेत प्रसिद्ध अभिनेत्री मेरी पिकफोर्डसुद्धा होती. लोक त्यांना पाहू शकत नाहीत असे चार्लीला जेव्हा वाटले तेव्हा डग्लसच्या खांद्यावर उभे राहून त्याने लोकांना अभिवादन केले. त्या स्थळाला सब-ट्रेझरी नावाने ओळखले जायचे. आता ते स्थळ फेडरल हॉल नॅशनल मेमोरियल म्हणून ओळखले जाते. त्याच वर्षी दोन्ही अभिनेत्यांनी 10 चित्रपटांत एकत्र काम केले होते. चार्ली, डग्लस, मेरी आणि दिग्दर्शक डी. डब्ल्यू. ग्रिफित यांनी युनायटेड आर्टिस्ट या कंपनीची स्थापनाही केली होती. त्या काळातील अभिनेत्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देणारे हे छायाचित्र. यात लोकांची सभ्यता आणि आदराचे दर्शन घडते. प्रचंड गर्दी उसळलेली असतानाही येथे धक्काबुक्की, पोलिस बंदोबस्त, सुरक्षा रक्षक किंवा चॅनल्सचे प्रतिनिधी असे काही दिसून येत नाही.
पुढील स्‍लाईडवर पाहा चार्ली चॅप्लिनची ऐतिहासीक फोटो...