आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...जेव्हा गाडीच्या आत शिरला चित्ता, घाबरले हे हनीमून कपल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- कारच्या छतावर चढलेला चित्ता पाहून घाबरलेला एडगर कोबोस)
एखादे कपल हनीमूनसाठी गेले आणि त्यांच्या समोर अचानक चित्ती येऊन उभा राहिला तर त्यांची काय अवस्था होईल हे सर्वांना ठाऊक आहे. पण तुम्ही म्हणाल असे कधी होत नाही. मात्र अशी घटना घडली आहे. अमेरिकेच्या वाशिंगटनचा रहिवासी स्टेसी आणि एडगर कोबोसचे नुकतेच लग्न झाले. ते उत्तरी तंजानियामध्ये आयोजित सेरेन्जेटी सफारी शिवीरमध्ये सुट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले होते. कारमध्ये फिरत असताना अचानक त्यांच्या गाडीवर एका चित्त्याने उडी घेतली आणि गाडीच्या छतावर जाऊन बसला. चित्ता पाहून या कपलला घाम फुटला.
झाले असे, की हे कपल जंगलाची भ्रमंती करण्यास निघाले, त्यांना एकाचवेळी अनेक चित्ते दिसले. त्यांनी आपली गाडी थांबवली आणि त्यांचे फोटो काढण्यास सुरुवात केली. तेव्हा एक चित्ता गाडीच्या छतावर चढला आणि कारच्या काचेतून आतमध्ये डोकावू लागला. त्यावेळी हे कपल घाबरून गेले.
उत्तरी तंजानियाचे हे क्षेत्र केन्या मसाई माराच्या बॉर्डरवर आहे. जवळपास 30,000 स्क्वेअर किमीमध्ये हे क्षेत्र पसरलेले आहे. येथे एका लग्जरी सफारी कंपनीव्दारा सफारी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या शिबीरात सहभाग नोंदवण्यासाठी आलेल्यांसाठी सहा मोबाईल टेन्टची सुविधा करण्यात आली होती. या परिसरात जंगली प्राण्यांचा वावर आहे. लोक येथे येऊन वाइल्ड लाइफचा आनंद घेतात. याच परिसरात या नवविवाहित जोडप्याचा सामना चित्त्याशी झाला. काही वेळानंतर चित्ता कारच्या खाली उतरला, त्याने कुणालाही काही नुकसान पोहोचवले नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या घटनेची काही छायाचित्रे...