हाँगकाँगमध्ये राहणे खरंच खूप कठिण आहे. याचा अंदाज तुम्ही फोटोमध्ये दिलेल्या इमारतीवरून बांधू शकता. वरील छायाचित्र हे ऑस्ट्रेलियन छायाचित्रकार स्टीवर्टने काढले आहे. त्याने 42 वर्षांपूर्वीची जूनी 'यिक चियोंग बिल्डिंग'चे सर्व स्परुप छायाचित्रात क्लिक केले आहे.
या शहरात तीन बेडरुमच्या फ्लॅटचे भाडे 60 हजार रुपये प्रति महिना असून 463 स्क्वेअर फुट फ्लॅटची किंमत जवळपास 18 कोटी रुपये आहे. त्यामुळे हाँगकाँग हे कार्यालय आणि मार्केटच्या बाबतीत अशियामध्ये चौथ्या आणि जगात 14व्या स्थानावरील सर्वात महागडे शहर म्हणून ओळखले जाते.
सर्वात गर्दीच्या शहरांमध्ये हाँगकाँगचा जगात चौथा नंबर आहे. इथे कंपनींना आपल्या कर्मचा-यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी 77.5 लाख रुपये वर्षाला खर्च करावे लागतात. हाँगकाँगला अधिकतर चीनचा विशेष प्रशासकीय प्रदेश म्हणून ओळखले जाते.
सर्वाधिक लोकसंख्या असणा-या हाँगकाँग शहरातील काही खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...