आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातच नव्हे, यूरोपमध्येही केला जातो बालविवाह, नंतर मुली असे जगतात आयुष्य..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालविवाह ही प्रथा केवळ भारतातच आहे असा आपण विचार करत असाल तर ते पूर्ण चुकीचे आहे. युरोपीय देशामध्ये लहान मुलामुलींचे लग्न लावून दिले जाते. येथील जॉर्जियाच्या ग्रामीण भागात ही प्रथा मोठ्या प्रमाणावर चालु आहे. यूनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडने केलेल्या सर्व्हेनुसार, सांगितले जाते की, जॉर्जियामध्ये 17 टक्क्यांहून अधिक मुलींचे लग्न वयाच्या 18 व्या वर्ष होण्याअगोदर केले जाते. 12-13 वर्षाच्या मुलीचे लग्न करणे येथे फार साधारण समजले जाते असे. लहान वयात लग्न करण्यामुळे मुलींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो..
 
गर्भनिरोधक साधनांविषयी अज्ञान आहेत मुली..
- 2010 साली झालेल्या एका सर्वेनुसार, जॉर्जियातील 15-19 वर्षाच्या 76 टक्के मुलीचे लग्न झाले आहे आणि त्यांना गर्भनिरोधक साधने काय आहेत याबद्दल काही माहिती नाही.
- अनेक मुली लग्नानंतर लगेचच प्रेग्नेंट होतात आणि कमी वयात आलेल्या प्रेग्नेंसीमुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. 
- जॉर्जियामध्ये सेक्स एज्युकेशनही नाही त्यामुळे लग्न म्हणजे नेमके काय हे बहुतेक मुलींना माहितीही नसते.
- जॉर्जियामधील मुलींचे लवकर लग्न कुठल्या एका धर्माशी निगडीत नाही. येथील सर्व मुलींबाबतीत हेच घडते. 
- जॉर्जियामधील मुले कमीतकमी त्यांचे शिक्षण पूर्ण करतात आणि त्यानंतरच लग्न करतात.
- सामाजिक दबाव असल्याने अनेक मुली खूप अगोदरच त्यांच्या मनाची तयारी करतात आणि लग्नासाठी तयार होतात. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, जॉर्जियामधील मुलींच्या लग्नाच्या वेळचे खास फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...