आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Granny Zhang Gets Arm Stuck In Toilet For 4 Hours

टॉयलेटमध्ये पडला दात आणि फसला हात, चार तासांनी झाली सुटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(टॉयलेटमध्ये फसलेल्या ग्रॅनीचा हात काढताना फायरफाइटर्स)
गुआंगयुआन- चीनच्या सिचुआन प्रांताच्या गुआंगयुआनमध्ये एका महिलेचा हात जवळपास चार तास टॉयलेटमध्ये अडकेला होता. 85 वर्षीय ग्रॅनी झांग बाथरुममध्ये आपले नकली दात स्वच्छ करत होती. अचानक दात तिच्या हातून खाली पडले आणि टॉयलेटमध्ये जाऊन पडले. तिने दात काढण्यासाठी टॉयलेटमध्ये हात घातला आणि तिचा हात फसला. लाख प्रयत्न करूनदेखील ग्रॅनी हात बाहेर काढू शकली नाही.
ही घटना घडली त्यावेळी तिच्या घरी कुणीच नव्हते. ग्रॅनी घरच्यांच्या येण्याची वाट पाहत राहिली. जवळपास एक तासांनी घरी परतलेल्या त्यांच्या सूनेने त्यांना अशा परिस्थिती पाहिल्यानंतर तिनेही हात बाहेर काढण्यास मदत केली मात्र, प्रयत्न अपयशी ठरले. ग्रॅनी यांच्या सूनेने इमरजेन्सी सर्व्हिसला घटनेविषयी माहिती दिला. त्यानंतर फायरफाइटर्सची टीम त्यांच्या घरी पोहोचली. त्यांनी ग्रॅनी यांचा टॉयलेयमध्ये अडकलेला हात बाहेर काढला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या घटनाक्रमाची छायाचित्रे...