आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इतर देशांपेक्षा 40 पट जास्त प्रदुषित आहे चीन, दरवर्षी होतो लाखो लोकांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनची ओळख जगभरात एक सुंदर देशाच्या रुपात आहे. येथील गगनचुंबी इमारती, नैसर्गिक सौंदर्य आणि लँडस्केप लोकांना आकर्षित करतात. लाखो पर्यटक हे सौंदर्य पाहण्यासाठी सुट्यांच्या दिवसांत गर्दी करतात. परंतु या सुंदर देशाचा दुसरा चेहरा तुम्ही पाहिला आहे का? हे शहर खूप दुषित असून येथील काही लोक कठिण परिस्थित राहत आहेत. येथील हवा इतर देशांपेक्षा 40 टक्के जास्त दुषित आहे. अमेरिकेमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, चीनमध्ये वायु प्रदूषण वाढल्याने कमीत कमी 4 हजार लोक दररोज येथे मृत्यूच्या दारात जातात. चीनमध्ये दरवर्षी वायु प्रदूषणामुळे 16 लाख लोक हृदय, फफ्फुस आणि स्ट्रोकच्या झटक्याने मरण पावतात.
सर्वेक्षणातील मुख्य लेखकानुसार, चीनची 38 टक्के लोकसंख्या सर्वाधिक प्रदूषित क्षेत्रांत आहे. त्यामध्ये बिजींगचे दक्षिण पश्चिम क्षेत्र सर्वात प्रदूषित आहे. तसेच पूर्वी चीनचा आर्धा भाग यापेक्षा जास्त प्रदूषित आहे.
चीनमध्ये अशा अनेक फॅक्ट्री आहेत, ज्या दिवस-रात्र लाखो टन कार्बन डाय-ऑक्साइडशिवाय विषारी वायू हवेत सोडतात. चीनमध्ये वायु प्रदूषणामुळे बहूतांश लोक तोंडाला मास्क लावून फिरतात.
चीनचे काही शहरे इतके दुषित आहेत, की लोकांना श्वास घेणेदेखील कठिण होऊन बसते. बिजींग आणि चीनच्या इतर क्षेत्रात नद्यांमध्ये फॅक्ट्री, कंपन्यांमधून निघणारे मटेरिअल, कचरा, घरातून बाहेर पडणारा कचरा टाकला जातो. त्यामुळे येथील वातावरण दुषित होते. येथील पाणी पिणे म्हणजे, मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. वाढत्या कंपन्यांमधून निघणा-या वायूने येथील वातावरण दुषित झाले आहे.
आज आम्ही तुम्हाला चीनची अचंबित करणारी छायाचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्रे क्वचितच तुम्ही यापूर्वी कधी पाहिली असतील... ही विदारक दृश्य मन हेलावून टाकणारी आहेत....पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा PHOTOS...