चीनमध्ये नवीन वर्षाच्या महोत्सवात चायनीज डान्सिंग स्टार येंग लिपिंगची 15 वर्षीय भाची वी केकीने एका परफॉर्मन्समध्ये सतत चार तास गोल-गोल फिरून डानस केला. हा परफॉर्मन्स 706 मिलियन लोकांनी लाइव्ह टीव्हीवर बघितला. परंतु आता या लाइव्ह टेलिकास्टने ऑनलाइन विवाद निर्माण केला आहे. कारण लोकांनी या कार्यक्रमाला दृष्टपणा म्हणून संबोधले आहे. चीनी टि्वटरच्या वीबो वेबसाइटवर येत असलेल्या प्रतिक्रियांनंतर वी केकीनेदेखील तिचे मत टि्वट करून व्यक्त केले आहे. ती म्हणते, 'माझ्यासाठी हे ध्यानधारणेसारखे आहे. मी फक्त मलाच स्वत:ची एक प्रतिस्पर्धी मानते.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा या संबंधीत काही छायाचित्रे...