चीनमध्ये झालेल्या शहरीकरणाचा प्रभाव संपूर्ण देशावर पडला आहे. मोठ्या शहरात जागेच्या किमती वाढल्याने नवी बांधकामे करणे पहिल्यासारखे सोपे राहिलेले नाही. यामुळे झेजियांग प्रांतात तिएनताई शहराच्या शाळेने त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जागा वापरात कशा आणता येतील यावर अविश्वसनीय असा मार्ग शोधला. शाळेच्या व्यवस्थापनाने आर्किटेक्ट रुआन हाओच्या सहकार्याने शाळेच्या छतावर 200 मीटर लांबीचा रनिंग ट्रॅक बनवला. मुलांना ट्रॅकवर जाण्यासाठी सहजसोप्या पद्धतीच्या पाय-याही बनवल्या आहेत. या आगळ्यावेगळ्या स्पोर्ट ट्रॅकची चर्चा सध्या जगभर होत आहे.
प्रारंभी शाळेचे व्यवस्थापन या ट्रॅकसाठी तयार नव्हते. मुलांच्या क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून हे ट्रॅक तयार करण्यात आले. ट्रॅकचा आराखडा इतका उत्तमरीत्या बनवण्यात आला होता की, त्याचे जगभरात कौतुक झाले. हा आराखडा 14 व्या व्हेनिस आर्किटेक्चर एक्झिबिशनमध्ये पाठवण्यात येत आहे. रुआन हाओ यांनी सांगितले, मुलांच्या क्रीडाभ्यासासाठी आवश्यक जागेची उपलब्धता नसल्याने त्यांनी हे आव्हान स्वीकारून शाळेच्या छतावरच रनिंग ट्रॅक बनवला.
पुढील स्लाईवर पाहा छतावरील रनिंग ट्रॅकची छायाचित्रे...