आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese She Ping Covered Himself With 456,500 Bee Weighing More Than 45kg

चीनी तरुणाचा अनोखा पब्लिक स्टंट, लाखो मधमाशा घेतल्या अंगावर पांघरुन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - आपला मधाचा व्यवसाय वाढविण्यासाठी एका चीनी व्यावसायिकाने एक मोठे धाडस केले आहे. स्वतःच्या अंगावर साडेचार लाखांहून (460,000) अधिक मधमाशा घेत त्याने स्टंट केला. त्याचे म्हणणे आहे, ''मी शुद्ध मधाची विक्री करतो, याची माहिती लोकांना व्हावी, यासाठी मी हा स्टंट करत आहे.''
'बी बिअर्डिंग' नावाचे तंत्र वापरून पिंग याने आपल्या अर्धनग्न अंगावर सुमारे 45 किलो वजनाच्या मधमाशा जणू पांघरून घेतल्या. अशा स्टंटमध्ये साधारणतः अंगाला एक जाळी लटकवून त्यामध्ये राणी माशीला ठेवून इतर मधमाशांना आकर्षित केले जाते. मात्र, पिंग याने हा स्टंट 28हून अधिक मधाच्या पोळ्या असलेल्या ठिकाणी अर्धनग्न अवस्थेत थांबून केला हे विशेष. 34 वर्षीय शी पींग नैऋत्य चीनमधील चाँगकिंग शहरातील रहिवाशी आहे. यासाठी त्याने शहराच्या बाहेरील परिसरात असलेल्या एका पहाडाची निवड केली होती.
शीची पत्नी आणि चार मध उत्पादक मित्रांनी त्याच्या अंगावर मधमाशांना बसवण्यास मदत केली. त्याचा हा कारनामा लोक 20 मीटर दूर अंतरावरून बघत होते. त्याला हे करण्यासाठी 40 मिनीटांचा कालावधी लागला.
जगातील अनेक न्यूज वेबसाइट्स हा कारनामा विश्व रेकॉर्ड असल्याचे सांगत आहे. परंतु गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, या विक्रमाची नोंद विपिन सेठच्या नावावर भारतीय तरुणाच्या नावार आहे. त्या रेकॉर्डनुसार, या विपिन सेठ याने 61.4 किलोग्रॅम (135 पौंड) मधमाशांनी आपले शरीर झाकून घेतले होते.
याविषयी शीचे म्हणतो, 'प्रामाणिकपणे सांगायचे तर मी घाबरलो होतो, पण माझ्या मधाची जाहिरात करण्यासाठी मी हे केले. मी 22 वर्षांचा असल्यापासून हे करीत आहे. आता मला सवय झाली आहे.'
लाखो मधमाशा आपल्या अंगावर पांघरुन घेण्याचा अनोखा विक्रम रचणा-या या व्यक्तीची काही छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...