आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Pics: 50 वर्षांपासून गुहेत राहते महिला, घर मिळाले तरीही गुहा सोडली नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमधील एक महिला मागील 50 वर्षांपासून गुहेत राहत आहे. त्याचठिकाणी तिने 7 बालकांना जन्म दिला आणि तिचा पतीही तिच्यासोबत राहत होता. परंतु मुले मोठी झाल्यानंतर गुहेत न राहता बाहेर निघून गेले आणि त्यांच्यासोबत वडीलही. वयाचा 78 वर्ष पूर्ण केलेली ही महिला गुहा सोडण्यास काही तयार नाही. तिच्यासाठी ही एक सुंदर जागा आहे. या महिलेचे नाव झोऊ गुआंगसु असून ती गिझोऊ नावाच्या पर्वतावर गुहेत राहते.

असे सांगण्यात येते की, लग्नानंतर ती आपल्या पतीसोबत या गुहेमध्ये राहण्यासाठी आली होती. स्थानिक प्रशासनाने 10 वर्षांपूर्वी तिला एक घर देण्याची तयारी दर्शवली होती, परंतु त्या महिलेने घर घेण्यास नकार दिला. पतीने दिलेल्या माहितीनुसार, त्या गुहेमध्ये तिला सुरक्षित वाटत असल्यामुळे ती गुहा सोडायला तयार नाही. वर्ष 2013 पर्यंत पती तिच्यसोबत गुहेतच राहत होता, परंतु आता तो सर्वात लहान मुलाकडे राहतो.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा महिला कशाप्रकारे राहते गुहेमध्ये...