बीजिंग: घरामध्ये झुरळ दिसताच त्यांना नष्ट करण्यासाठी मनुष्य विविध शक्कल लढवतो. काही लोकांना झुरळाची भितीदेखल वाटते. मात्र चीनममध्ये एका महिलेने झुरळ पाळून त्यांच्यापासून लाखो रुपये कमावले. या महिलेने एक लाखांपेक्षा जास्त झुरळ घरात पाळून ठेवलेले आहेत. महिला पाळलेले झुरळ फार्मा कंपनीला औषधे म्हणून विकते त्यामधून तिला लाखो रुपये मिळतात.
चीनची रहिवासी 37 वर्षीय युआन मेक्सिया फुजियान प्रांतातील एका औषधी कंपनीमध्ये काम करते. औषधांसाठी झुरळाच्या वाढत्या मागणीकडे बघता या महिलेने स्वत:च्या घरात झुरळ पाळण्यास सुरूवात केली. सध्या तिने 1 लाखांपेक्षा जास्त झुरळ पाळलेले आहेत. औषधी कंपनीला मेक्सिको 100 डॉलर (5989.50 रुपये) प्रति किलोच्या भावात झुरळ विकते.
औषधी कंपनी झुरळांना जिवंत घेत नाही त्यामुळे मेक्सिकोला त्यांना पाण्यात बुडून मारावे लागते. त्यानंतर उन्हात सुकवावे लागते. मेक्सिया म्हणते, 'मी झुरळांना मुलांसारखे पाळते'
ती सिकियान काउंटीमध्ये दुस-या घरात राहते मात्र झुरळ पाळलेल्या घरी ती दररोज जाते. झुरळांना विकण्याच्या कारणामुळे युवान मेक्सिया लोकल सेलिब्रिटी बनली आहे. मेक्सिया अमेरिकेत आढळणा-या पालमेट्टो प्रजातीचे झुरळ पाळते. हे झुरळ मोठ्या पंखाचे असतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा महिलेने घरात कसे पाळले झुरळ...