आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायनस 35 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असलेले जगातील सर्वात थंड शहर, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिमाचल प्रदेशमध्‍ये सध्‍या कडाक्याची थंडी पडली आहे. हरियानामध्‍येही कधी नव्‍हे ती बर्फवृष्‍टी होत आहे. शिमलामध्‍ये 17 वर्षांपूर्वीचा आणि मंडीमध्‍ये 24 वर्षांपूर्वीचा थंडीचा रेकॉर्ड यावर्षी ब्रेक झाला आहे. या थंडीमुळे जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. या थंडीच्‍या निमित्ताने आज आम्‍ही जगातील सर्वात थंड म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या शहराची माहिती देणार आहोत.
या शहरात वर्षातील 365 दिवस फक्‍त बर्फ आणि थंडीचा अनुभव घेता येतो. रशियाचे सुंदर पर्यटनस्‍थळ म्‍हणून प्रसिद्ध असलेल्‍या याकूत्‍स्क या शहराला जगातील सर्वात थंड शहर म्‍हणून ओळखले जाते. या शहरात मायनस 35 डिग्री सेल्सिअस तापमानापेक्षाही कमी तापमान असल्‍याचे पाहायला मिळते.
याकूत्‍स्कचे हवामान-
या शहरात 12 मे ते 10 सप्‍टेंबर या काळात उन्‍हाळा असतो. मात्र या काळात याकूत्‍स्कमध्‍ये 12 डिग्री सेल्सिअस तापमान असल्‍याचे अनुभवायला मिळते. 17 जुलै हा सर्वात उष्‍ण दिवस म्‍हणून ओळखला जातो. या दिवशी याकूत्स्कमध्‍ये 25 डिग्री सेल्सिअस तापमान असते. 12 जानेवारी हा दिवस सर्वात थंड दिवस म्‍हणून ओळखला जातो. या दिवशी मायनस 36 डिग्री सेल्सिअस तापमाप असते.
पुढील स्‍लाईडवर पाहा जगातील सर्वात थंड शहराची छायाचित्रे...