आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमध्ये कुत्र्यांसाठीही संगणक बनवण्याचे प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनमधील शास्त्रज्ञ कुत्र्यांना वापरता येईल, असा संगणक डिझाइन करत आहेत. या संगणकावर कुत्र्यांना खेळण्याबरोबरच स्वयंचलित घरगुती उपकरणे हाताळता तर येतीलच शिवाय मालकांशी संवादही साधता येईल. ब्रिटनच्या मुक्त विद्यापीठातील संशोधक कुत्र्याचे संगोपन करणार्‍या स्वयंसेवी संस्था आणि श्वानालयांसोबत काम करत आहेत. संगणकामध्ये ‘स्मार्ट केन्निल्स’ इन्स्टॉल करण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न आहे. या संगणक हाताळणीचे प्रशिक्षणही श्वानालयांमार्फतच कुत्र्यांना दिले जाणार आहे.