आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Costa Concordia Vessel To Be Towed From Giglio In Final Step

'टायटॅनिक'पेक्षा भव्य आहे 'कॉनकॉर्डिया जहाज', 30 महिन्यानंतर पुन्हा तरंगू लागले समुद्राच्या लाटांवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉनकॉडिया जहाज
गिग्लियो (इटली): गेल्या अडीच वर्षांपासून समुद्रामध्ये फसलेल्या भव्य लग्झरी क्रूज कोस्टा कॉनकॉर्डिया हे जहाज पुन्हा एकदा समुद्राच्या लाटांवर तरंगू लागले आहे. या जहाजचा हा शेवटा प्रवास आहे. एका दुस-या जहाजाच्या मदतीने या भव्य जहाजाला ओढून समुद्राबाहेर काढण्यात येणार आहे. समुद्रातून बाहेर आणल्यानंतर कॉनकॉर्डियाला निरुपयोगी म्हणून घोषित करण्यात येणार आहे.
टायटॅनिकपेक्षा दोन पटीने मोठे हे जहाज 12 जानेवारी 2012मध्ये इटलीच्या गिग्लिया व्दीप जवळ उलटले होते. तेव्हापासून हे जहाज समुद्रात पडलेले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये याला सरळ करण्यात आले आणि तेव्हापासून त्यातून पाणी बाहेर काढण्यात येत आहे. अथांग प्रयत्नानंतर जहाज या स्थितीत पोहोचले आहे.
ब्लिस्टरव्दारा लाटांवर आणले
जहाजला सरळ करण्यासाठी याच्या पुढील भागात दोन ब्लिस्टर टँक जोडण्यात आले आहे. त्याचे वजन जवळपास 1700 टन होते. अर्थातच 7 स्टॅचू ऑफ लिबर्टीच्या बरोबरीने. या टँकमध्ये पाणी भरण्यात आले आणि प्लॅटफॉर्मच्या मदतीने त्याला सरळ करण्यात आले.
32 लोकांचा झाला मृत्यू
कॉनकॉर्डिया 950 फुट लांब लाइनर क्रूज होते. याच्यावर जवळपास 4229 प्रवासी आणि क्रू मेंबर्स प्रवास करत होते. 12 जानेवारी 2012 रोजी जहाज गिग्लियो व्दीपच्या जवळच्या खडकांवर धडकले आणि या अपघातात 32 लोकांचा मृत्यू झाला. जवळपास अडीच वर्षांनंतर हे जहाज पुन्हा तरंगायला लागले आहे. कोस्टा कोनकोर्डियाला 2004मध्ये बनवण्यात आले होते. 2005पासून 2012पर्यंत हे जहाज कार्यरत होते. त्यामध्ये 1500 केबिन आणि 3780 लोक प्रवास करू शकत होते.
कोस्टा कॉनकॉर्डिया v/s टायटॅनिक
टायटॅनिक जहाज 46,000 टन इतक्या वजनाचे होते. तसेच कोस्टा कॉनकॉर्डियाचे वजन 114,500 टन होते. टायटॅनिकच्या तुलनेत याची रुंदीसुध्दा जास्त होती. टायटॅनिक 882 फुट आणि 8 इंच (268 मीटर) लांब होते. तसेच, कॉनकॉर्डिया 951 फुट 5 इंच (290 मीटर) लांब होते. टायटॅनिकची रुंदी 28 मीटर अर्थातच कॉनकॉर्डियाची रुंदी 36 मीटर होती.
टायटॅनिकपेक्षा मोठे असलेल्या या जहाजाची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...