आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: लाइफ Enjoy करण्यासाठी नोकरीवर सोडले पाणी, घरही विकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोटीतून देशांची भ्रमंती करणारे कपल
लंडन- 29 वर्षांची चार्ली स्मिथ आणि 34 वर्षीय कॅप्टेनने आपले आयुष्य वेगळ्या आणि अनोख्या पध्दतीने जगण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यासाठी घरदेखील विकले. इतकेच नव्हे, दोघांनी घर विकण्यापूर्वी नोकरी सोडली. त्यानंतर स्मिथ आणि कॅप्टेन यांनी लग्नासाठी साठवलेले पैसे आणि समुद्रात एक बोट घेऊन निघाले.
कॅप्टेन पेशाने आर्किटेक्चर इंजिनिअर होता आणि त्याची गर्लफ्रेंड चार्ली मॉडेल होती आणि टीव्हीवर शो करत होती. दोघे ब्रिटनच्या जर्सीमध्ये राहत होते. या जोडीने समुद्रातील आयुष्य जगण्यासाठी 38 फुट लांब सेलिंग बोट खरेदी केली होती. मात्र त्यापूर्वी त्यांनी कधीच बोटीतून प्रवास केलेला नव्हता. या जोडीने समुद्रावर घालवलेले क्षण सोशल साइट्सवर खूप शेअर केले जात आहेत.
त्यांनी मागील काही महिन्यांपूर्वी फ्रान्स, स्पेन, इटली, एल्बा, कोर्सिका, सर्डिनिया आणि बॅलेरिक आयलँडसारख्या ठिकाणी प्रवास केला. कपलच्या ट्रॅव्हलचे फोटो खूपच रंजक आहेत.
या कपलने सांगितले, की फ्रान्सच्या कॅलेनकुसपासून यूरोपच्या बाहेरील भागापर्यंतच्या प्रवासात अनेक सुंदर क्षण मिळवले. काही ठिकाणे नैसर्गिकरित्या खूपच सुंदर आणि डोळे दिपवणारी होते. त्यांनी सांगितले, की पूर्वी ते हॉटेलमध्ये थांबायचे आणि अनेक ठिकाणी फिरायचे. परंतु बोटीतून प्रवास करून फिरणे खूपच वेगळा अनुभव आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या रोमँटिक कपलचा अनोखा प्रवास...


बातम्या आणखी आहेत...