आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Weird - चक्क फोटोग्राफरचा कॅमेराच खाल्ला मगरीने, पाहा अंडरवॉटर फोटोग्राफीची करामत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(तोंडात कॅमेरा पकडल्यानंतर फोटोग्राफरने दुसर्‍या कॅमेर्‍याने काढलेला फोटो)
वाइल्ड लाइफ अथवा खतरनाक जनावरांची अंडरवॉटर फोटोग्राफी करणे खुपच जोखमीचे काम आहे. अशा प्रकारची फोटोग्राफी करणारे अनेक फोटोग्राफर नेहमी कोणत्या ना कोणत्या अडचणीत सापडत असतात. अनेकदा तर त्यांच्या जीवालाही धोका असतो, एवढे सर्व होऊनही या लोकांचे वाइल्ड लाईफ फोटोग्राफीचे क्रेझ काही केल्या कमी होत नाही. नुकतेच अंडरवॉटर फोटोग्राफी करणार्‍या एमोस नाकोहम सोबतही अशीच एक विचित्र घटना घडली आहे.
आफ्रिकेतील बोत्सवानच्या ओकावेंगो डेल्टामध्ये अंडरवॉटर फोटोग्राफी करण्यास गेलेले एमोस नाकोहमकडून एका मगरीने त्यांचा कॅमेरा काढून घेतला, हा कॅमेरा मगरीच्या दातात अडकला. एमोसने दुसर्‍या कॅमेर्‍याने हा मगरीचा फोटो काढला आहे. ते म्हणाले, मगर गेल्यानंतर मी कॅमेरा शोधण्याचा बराच प्रयत्न केला, मात्र तो मला सापडला नाही.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, एमोस नाकोहम यांच्या अंडरवॉटर फोटोग्राफीतील काही निवडक फोटो...