आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ruthless Crocs Attack On Zebra In Maasai Mara National Reserve

मगरींनी झेब्र्याची अशी केली शिकार, क्षणांत केले फस्त, पाहा थरारक दृश्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिकार म्हटले, की मगर, सिंह किंवा वाघाची आठवण होते. परंतु त्यांनी केलेल्या शिकारीची छायाचित्रे क्वचितच समोर येतात. असाच एक शिकारीचा भयावह प्रकार दक्षिण आफ्रिकेच्या मसाई मारा या नॅशनल पार्कमध्ये घडली आहे. या वरील छायाचित्रात दिसते, की एका झेब्र्याला दोन मगरींनी वाईट पध्दतीने फाडून खाल्ले आहे. ही घटना फोटोग्राफर पाअलो टोरचियोने क्लिक केली आहेत. पाअलोने मगरींनी कशा पध्दतीने झेब्र्याची शिकार केली हे कॅमे-यात क्लिक केले आहे.
दोन्ही मगर झेब्र्याचा नदी किनारावर येण्याची वाट पाहत होत्या. आपली तहान भागवण्यासाठी पाणी पिण्यासाठी पाण्याजवळ आलेल्या झेब्र्याची शिकार करून मगरींनी आपली भूखच भागवली. झेब्रा पाण्याजवळ जाताच एका मगरीने त्याच्या हल्ला केला. मगरीने केलेला हल्ला पाहून झेब्रा घाबरला आणि मगरीच्या तावडीत सहज सापडला. झेब्र्याने मगरींच्या तावडीतून स्वत:ला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. काही क्षणांत मगरींनी त्या मारले आणि त्याचे तुकडे-तुकडे करून खाल्ले.
ही घटना खूपच भयावह होती. आपल्याही अंगावर शहारे उभे राहतील असे फोटो फोटोग्राफरने कॅमे-यात क्लिक केले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या थरारक घटनेची काही छायाचित्रे...