आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिलिव्हरी रूममध्ये जेव्हा डॅडीला मिळाली एंट्री, समोर आले असे Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलाच्या जन्मादरम्यान ऑपरेशन थिएटरमध्ये किंवा लेबर रूममध्ये वडील उपस्थित असणे हे काहीसे विचित्र वाटू शकते. किमान आपल्या देशात तरी अद्याप असे होत नाही. पण अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये नवऱ्याने डिलिव्हरीदरम्यान पत्नीबरोबर राहणे ही अगदी सामान्य बाब आहे. पत्नीला मानसिक आधार आणि मुलाबरोबर बाँडींग होण्यासाठी ते गरजेचे समजले जाते. या दरम्यान आई आणि वडील दोघेही भावनिक क्षणांना सामोरे जात असतात. विशेष म्हणजे हे क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी येथे फोटोग्राफरही असतात. 

पूर्वी नव्हते असे.. 
- अमेरिकेत 1970 च्या दशकात बहुतांश हॉस्पिटल्समध्ये लेबर रूममध्ये पतीला जाण्याची परवानगी नसायची. 
- अमेरिकेत अपवाद वगळता सर्व डिलिव्हरी या अमेरिकेतच होत असतात. त्याठिकाणी सुमारे 80 वर्षांपूर्वी 1938 मध्येही अर्ध्यापेक्षा अधिक प्रसुती हॉस्पिटल्समध्येच व्हायच्या. 
- 1960 च्या दशकात पुरुषांना लेबर रूममध्ये प्रवेश मिळू लागला. पण त्यावेळी त्यांना फक्त लेबर पेन असेल तोवरच बायकोसोबत राहता यायचे. मुलाच्या जन्माची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी त्यांना बाहेर पाठवले जायचे. 
- नंतर 70 च्या दशकात पूर्णवेळ पतीला लेबर रूमध्ये राहू देण्याची पद्धत सुरू झाली. 80 च्या दशकात ही पद्धत अधिक वाढत गेली. 
- आता तर पाश्चिमात्य देशांमध्ये ही बाब कायमची बनली आहे. भारतासाठी मात्र ही विशेष बाब आहे. 
- पाश्चिमात्य देशांमध्ये महिलांसाठी चाइल्ड बर्थ क्लास असतात. त्यात महिलांकडून विविध प्रकारचे व्यायाम आणि बाळाच्या जन्माच्या वेळी स्वतःला रिलॅक्स ठेवण्याचे तंत्र शिकवले जाते. अनेक भावी पिताही या क्लासमध्ये जातात. 
- अनेक ठिकाणी तर मुलाच्या वडिलांना गरज पडल्यास मेडिकल स्टाफला मदत करण्याची परवानगीही असते. 
- बाळाला या जगात जन्म घेतल्यानंतर सर्वात आधी आपला स्पर्श होणे ही कोणत्याही पित्यासाठी अभिमानास्पद बाब असते. 
- या क्षणांना कॅमेऱ्यात टिपण्यासाठी याठिकाणी प्रोफेशनल फोटोग्राफर्सही असतात. ते मुलाच्या जन्माचे आणि विविध इमोशन्सचे फोटो टिपत असतात. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, पती-पत्नी आणि पिता-मुलाचे बाँडींग दाखवणारे PHOTOS 
बातम्या आणखी आहेत...