अमेरिकेतील नेवाडा याठिकाणी वेश्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता प्राप्त आहे. नेवाडामध्ये अनेक वेश्या ब्रॉथेल (कुंटणखाणा) आहेत. येथे तरुणी बिनधास्तपणे वेश्या व्यवसाय करतात. या ठिकाणी राहणा-या स्त्रियांचे जीवन कसे असते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला फोटोग्राफर मार्क मॅक अँड्र्यूज यांनी.
मार्क यांनी पाच वर्षे नेवाडातील विविध वेश्यालयात घालवून येथील महिलांचे जीवन आणि त्यांचे राहणीमान जाणून घेतले आणि त्यांचे आयुष्य आपल्या कॅमे-यात बंदिस्त केले. विशेष म्हणजे यापूर्वी मार्क कधीही कुठल्याही वेश्यालयात गेले नव्हते. पण आता याठिकाणी असलेल्या प्रत्येक वेश्यालयात ते राहून आले आहेत. या ठिकाणचे वातावरण आणि तेथे काम करणाऱ्या स्त्रिया यांचे जीवन कसे असते ते कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी मार्क यांनी हा निर्णय घेतला.
आठवठाभर ते महिना महिना मार्क या स्त्रियांसोबत राहिले. त्यांच्या सोबत त्यांच्याच घरात राहून पहाटे उठल्यापासून ते संपूर्ण दिवसातील त्यांच्या दैनंदिन कामांचे निरीक्षण मार्क करायचे. त्यानंतर त्यांना हवे तसे फोटो मार्क यांनी टिपले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा मार्क यांनी टिपलेले वेश्यालयातील महिलांचे जीवन...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)