(ऑकलँड सिटी हॉलच्या भिंतीवर डान्स परफॉर्म करताना डान्सर)
कधी तुम्ही भव्य इमारतीच्या भिंतीवर डान्स करणारे डान्सर्स पाहिले आहेत का? पायाला दोरी बांधून डान्स करणारे डान्सर्स भिंतीवर नव्हे जमीनीवर पाहिले असतील. मात्र ऑकलँडच्या बांडालूप डान्स कंपनीशी जोडलेल्या दोन शानदार डान्सर्स अमेलिया रुडोल्फ आणि रोएल सीबरने असा डान्स करून दाखवला आहे.
या दोन्ही डान्सर्सने आकलँडच्या सिटी हॉलच्या भिंतीवर ऑकलँड सिटी वार्षिक समारंभात पायाला दोरी बांधून डान्स केला. प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकवणारा दोघांचा डान्स तोंडात बोट घालण्यासारखा होता. कारण एक छोटी चुक त्यांना महागात पडली असती. खतरनाक डान्स स्टंट करणा-या या जोडीने उपस्थित लोकांचे क्षणात मन जिंकले.
बांडालूप डान्स कंपनीशी जोडलेल्या सर्व डान्सर्स अशाप्रकारचे डान्स करण्यात पटाईत आहेत. ते जगभरातील अनेक भागांत असे परफॉर्मन्स देतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या ग्रुपने केलेल्या काळजाचा ठोका चुकवणा-या डान्सची छायाचित्रे...