आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Hostile: फोटोग्राफरने जीव संकटात टाकून काढले धगधगत्या ज्वालामुखीचे फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हा फोटो अमेरिकेतील हवाई आयलॅंडचा आहे.)
व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या हौशी फोटोग्राफरने जगभरातील धोकादायक ठिकाणांना भेटी देऊन तेथील वातावरण कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केला. या फोटो सिरिजला त्याने एलियन अर्थ असे नाव दिले. यावेळी त्याने चक्क धगधगत्या ज्वालामुखींचेही फोटो घेतले आहेत.
या फोटोग्राफरचे नाव मार्टिन रीज असे आहे. 50 वर्षांच्या असतानाही गेल्या 10 वर्षांपासून तो हौशी फोटोग्राफी करीत आहे. त्याने आतापर्यंत 40 फोटो सिरिज तयार केल्या असून 50 पेक्षा जास्त देशांना भेटी दिल्या आहेत.
त्याचे म्हणणे आहे, की ही ठिकाणी धोकादायक आहेत. असामान्य आहेत. येथील परिस्थिती विपरित आहे. पण येथील सौंदर्य मला भुरळ पाडते. या ठिकाणांना त्याने एलियन अर्थ असे नाव दिले आहे. तो या ठिकाणांना ब्युटी ऑफ डिझास्टर असेही म्हणतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, मार्टिन रीजने आतापर्यंत कोणकोणते फोटो काढले आहेत...